ठाणे जिल्हा

ठाण्याचे पूर्वीचे नाव श्रीस्थानक होते. भारत देशात पहिली आगगाडी (रेल्वे) ही दि. 16 एप्रिल 1853 साली मुंबई ते ठाणे येथे सुरु झाली. सागरी, डोंगरी व नागरी अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना ठाणे जिल्ह्याला लाभली आहे. ठाणे जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्यादेखील मोठ्या प्रमाणावर आहे.

तलावांचा जिल्हा म्हणुन देखील ठाणे जिल्हा ओळखला जातो. जवळजवळ ३५ तलाव या शहरात आपल्याला पहायला मिळतात, त्यातला मासुंदा तलाव अधिक सुंदर आणि परिसर प्रसन्न आहे.

6 महानगरपालिका, 2 नगरपालिका, सिडको, एमआयडीसी आदी नियोजन प्राधिकरणे असलेला ठाणे हा राज्यातला एकमेव जिल्हा आहे. सर्वाधिक महसूल उत्पन्न देणारा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो. ठाणे जिल्हयात 18 आमदार आणि 3 खासदार एवढे लोकप्रतिनिधी आहेत.

सर्वाधिक धरणं असल्यामुळे पाणी पिकवणारा जिल्हा अशी ठाणे जिल्हयाची ओळख आहे. शहापूर तालुका हा तर धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. केंद्र शासन अंगीकृत दारु गोळा व शस्त्र निर्मिती करणारा कारखाना अंबरनाथ या तालुक्यात आहे. ठाणे जिल्हयातील भिवंडी हे शहर हातमाग यंत्रावर कपडे विणण्यासाठी प्रसिध्द आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने ठाणे जिल्हयात 10 औद्योगिक वसाहती विकसित केल्या आहेत. तीन राष्ट्रीय महामार्ग व तीन लोहमार्ग ठाणे जिल्हयातून जातात. तलावांचे शहर अशी ठाणे शहराची ओळख आहे. हाजीमलंगगड, गोरखगड, माहुली इ. ऐतिहासिक किल्ले ठाणे जिल्ह्यात आहेत.

ठाणे जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. 2014 मध्ये या जिल्ह्याचे विभाजन करुन पालघर या नविन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे.

ठाणे जिल्ह्यातील तालुके :– ठाणे शहर (महापालिका क्षेत्र), कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर्, उल्हासनगर, अंबरनाथ

प्रमुख शहरे – ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, नवी मुंबई

PUNE DISTRICT - PROMISING POLITICIANS

vijay-nahata

विजय नाहटा - शिवसेना

शिवसेना उपनेते

vaibhav-naik

वैभव नाईक - भाजपा

नवी मुंबई भाजपा नेते

vijay-mane

विजय माने - शिवसेना

शहर प्रमुख - नवी मुंबई

bhaskar-yamgar

भास्कर यमगर - भाजपा

जिल्हाध्यक्ष, नवीमुंबई (भटके विमुक्त आघाडी)

ramdas-pawale

रामदास पवळे - शिवसेना

नगरसेवक, प्र. क्र. ४९ कोपरखैरणे

pravin-dhanawade

प्रविण धनावडे - शिवसेना

विभाग प्रमुख, नेरूळ (प) नवी मुंबई

vaishali-ghorpade

वैशाली घोरपडे - शिवसेना

महिला उपशहर संघटक कोपरखैरणे विभाग

prashant-patil-130x89

प्रशांत पाटील - राष्ट्रवादी

राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष, नवी मुंबई जिल्हा

photo-not-available
photo-not-available
photo-not-available
photo-not-available
photo-not-available
photo-not-available

Comming soon...

Comming soon...

Comming soon...

Comming soon...

Comming soon...

Comming soon...