पुणे जिल्हा

पुणे जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण ”पुणे तिथे काय उणे ”  प्रचलित आहे . पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला ठाणे जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा तर ईशान्य व पूर्वेस अहमदनगर जिल्हा आहे.

पुणे शहरातील पुणे विद्यापीठ हे जगप्रसिद्ध असून पुण्यास “पूर्वेचे ऑक्सफर्ड” असेही म्हणतात.त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व डिग्री घेणेसाठी प्रवेश घेत असतात .त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात . बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले .कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या .येथे थोर संत जन्मले . छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर व पुरंदर किल्ल्यावर झाला.

शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.

पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत : १) जुन्नर २) आंबेगाव ३) खेड ४) मावळ ५) मुळशी ६) हवेली ७) वेल्हे ८) भोर ९) पुरंदर १०) बारामती ११) इंदापूर १२) दौंड १३) शिरूर १४) पुणे शहर

राजकीय संरचना
लोकसभा मतदारसंघ ( ४ ) : पुणे, बारामती, शिरूर व मावळ. (मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)

विधानसभा मतदारसंघ (२१) : जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, मावळ, चिंचवड, पिंपरी, भोसरी, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅंटॉन्मेंट व कसबा पेठ.

जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत. तसेच जिल्ह्यात १४०१ ग्रामपंचायती आहेत.

PUNE DISTRICT - PROMISING POLITICIANS

ajit-pawar

अजित पवार- राष्ट्रवादी

उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

supriya-sule

सुप्रिया सुळे - राष्ट्रवादी

खासदार - ३५, बारामती

sunil-shelke-130x89

सुनील शेळके - राष्ट्रवादी

आमदार, मावळ विधानसभा

sanjay-bhegade

संजय बाळा भेगडे BJP

मा. आमदार मावळ विधानसभा

babanrao-bhegade

बबनराव भेगडे - राष्ट्रवादी

अध्यक्ष - विधानसभा क्षेत्र मावळ

santosh-bhegade

संतोष भेगडे - राष्ट्रवादी

नगरसेवक, तळेगाव नगर परिषद

ganesh-kakade

गणेश काकडे - राष्ट्रवादी

विरोधी पक्षनेता त.दा.न.प.

rupali-chakankar

रुपाली चाकणकर - राष्ट्रवादी

अध्यक्ष- राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य

ramesh-salve

रमेश साळवे

राष्ट्रीय अध्यक्ष स्वाभिमानी रिपब्लीकन पक्ष

ganesh-khandge

गणेश खांडगे - राष्ट्रवादी

अध्यक्ष, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस

bhausaheb-bhoir

भाऊसाहेब भोईर - काँग्रेस

अध्यक्ष पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटी

vitthal-shinde

विठ्ठलराव दगडू शिंदे

सरचिटणीस - पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस

dattatray-gund

दत्तात्रय शंकरराव गुंड

सदस्य, जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन समिती पुणे

jalinder-shinde

जालिंदर (बापू) शिंदे

PCMC प्रभाग क्रमांक ३३, नगरसेवक

eknath-dada-thorat

एकनाथ दादा थोरात

मा. नगरसेवक व स्थायी समिती सदस्य (PCMC)

ram-jambhulkar

राम नामदेवराव जांभूळकर

सचिव महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस

suryakant-waghmare

सूर्यकांत वाघमारे - RPI (Athwale)

पुणे जिल्हा अध्यक्ष

harish-kokre

हरीश कोंडू कोकरे - राष्ट्रवादी

पंचायत समिती सदस्य मावळ तालुका

suresh-dhotre

सुरेश धोंडिबा धोत्रे - राष्ट्रवादी

मा. नगराध्यक्ष - तळेगाव दाभाडे नगरपरिषद

suresh-kadu

सुरेश हरिभाऊ कडू

सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस मावळ तालुका

amol-kedari

अमोल सुरेश केदारी

उपाध्यक्ष विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा

vilas-shinde

विलास शंकर शिंदे

भा.यु.मो. कार्याध्यक्ष देहूरोड शहर

ranjana-bhosale

अ‍ॅड. रंजना भोसले - काँग्रेस (आय)

नगसेवक, तळेगाव दाभाडे नगरपरिषद

Comming soon...

Comming soon...

Comming soon...

Comming soon...

Comming soon...

Comming soon...