महाराष्ट्रातील महानगरपालिका

शहराच्या प्रशासनासाठी महानगरपालिकांची निर्मिती केली जोते. शहरामध्ये महानगरपालिका स्थापन करण्याचा किंवा नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याचा अधिकार हा राज्य शासनास आहे.

मुंबई महानगरपालिका कायदा १८८८ साली करण्यात आला. १८८८ साली स्थापन झालेली मुंबई महानगरपालिका (Bombay Municipal Corporation) ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका होय. स्वातंत्र्योत्तर काळात १९४७ साली केवळ मद्रास, कलकत्ता आणि मुंबई ह्या शहरांसाठीच महानगरपालिका होत्या.

नागरी लोकसंख्येच्या आधारे महानगरपालिकांची चार गटांत विभागणी केली जाते. एक कोटी लोकसंख्येची शहरे ‘अ+ (A+)’ श्रेणीत त्यानंतर अ (A) ते ड (D) श्रेणीपर्यंत वर्गीकृत करण्यात येते. या यादीत ‘अ+’ ग्रेड असलेली एकमेव बृहन्मुंबई महानगरपालिका आहे.

ज्या मोठ्या शहराची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक असते तेथील नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेचे रूपांतर यथावकाश महानगरपालिका या वरच्या दर्जाच्या संस्थेत केले जाते. महानगरपालिकेला इंग्रजीत म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मध्य प्रदेश राज्यात नगर पालिका निगम आणि अन्य हिदी भाषक राज्यांत नगर निगम म्हणतात. महानगरपालिका या लांबलचक शब्दाऐवजी मराठीत या संस्थेचा उल्लेख महापालिका या सुटसुटीत नावाने होतो.

जून २०२२ रोजी महाराष्ट्रात एकूण २८ महानगरपालिका आहेत. इचलकरंजी महानगरपालिका ह्या नवीन महानगरपालिकेची २०२२ मध्ये घोषणा करण्यात आली.

महाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादी

अ. क्र.

नाव

शहर

जिल्हा

स्थापना

सत्ताधारी पक्ष

1

मुंबई

मुंबई शहर जिल्हा,

मुंबई उपनगर जिल्हा

1888

2

पुणे महानगरपालिका

पुणे

पुणे


1950

3

नागपूर महानगरपालिका

नागपूर

नागपूर

1951

4

सोलापूर महानगरपालिका

सोलापूर

सोलापूर

1964

5

कोल्हापूर महानगरपालिका

कोल्हापूर

कोल्हापूर

1972

काँग्रेस आणि राष्ट्रवादी

6

औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद

औरंगाबाद


1982


7

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

कल्याण-डोंबिवली

ठाणे

1982

8

ठाणे महानगरपालिका

ठाणे

ठाणे

1982

9

नाशिक महानगरपालिका

नाशिक

नाशिक

1982

10

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

पिंपरी-चिंचवड

पुणे

1982

11

अमरावती महानगरपालिका

अमरावती

अमरावती

1983

12

नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई

ठाणे

1992

काँग्रेस आणि राष्ट्रवादी

13

नांदेड-वाघाळा महानगरपालिका

नांदेड-वाघाळा

नांदेड

1997

14

उल्हासनगर महानगरपालिका

उल्हासनगर

ठाणे

1998

15

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका

सांगली, मिरज, कुपवाड

सांगली

1998

16

अकोला महानगरपालिका

अकोला

अकोला

2001

17

भिवंडी-निजामपुर महानगरपालिका

भिवंडी-निजामपुर

ठाणे

2002

18

मीरा-भाईंदर महानगरपालिका

मीरा-भाईंदर

ठाणे

2002

19

अहमदनगर महानगरपालिका

अहमदनगर

अहमदनगर

2003

20

जळगाव महानगरपालिका

जळगाव

जळगाव

2003

21

धुळे महानगरपालिका

धुळे

धुळे

2003

22

मालेगाव महानगरपालिका

मालेगाव

नाशिक

2003

काँग्रेस आणि शिवसेना

23

वसई-विरार महानगरपालिका

वसई-विरार

पालघर

2009

24

चंद्रपूर महानगरपालिका

चंद्रपूर

चंद्रपूर

2011

25

परभणी महानगरपालिका

परभणी

परभणी

2011

काँग्रेस आणि राष्ट्रवादी

26

लातूर महानगरपालिका

लातूर

लातूर

2011

27

पनवेल महानगरपालिका

पनवेल

रायगड

2016

28

इचलकरंजी महानगरपालिका

इचलकरंजी

कोल्हापूर

2022

0
Would love your thoughts, please comment.x
()
x