| Thane  |  Vijay J. Mane

vijay-mane
shivsena-200x200

Name : 

विजय जगन्नाथ माने

Constituency :

बेलापूर विधानसभा मतदार संघ

Party Name :

शिवसेना

Designation : 

शिवसेना शहर प्रमुख – नवी मुंबई

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : विजय जगन्नाथ माने

Father's Name : जगन्नाथ माने

Mother’s Name : लक्ष्मीबाई जगन्नाथ माने

Date of Birth: : २६ जानेवारी १९७२

Place of Birth: : सातारा, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

No. of Children : एकूण - ०२, मुलगी - ०१, मुलगा - ०१

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : एस. एस. सी.

Profession : शेती, व्यवसाय

Hobby : सामाजिक कार्य

Residence Address : ११०१, सी ब्रीज टॉवर, टॉवर - ९, सेक्टर - १६, नेरुळ, नवी मुंबई

Office Address : सागर दर्शन टॉवर, शॉप नं - ०४, सेक्टर - १८, नेरुळ, नवी मुंबई

Phone No. : +91 9820124038, फोन - 022 7704038

राजकीय कारकीर्द
- शिवसेना शहर प्रमुख - नवी मुंबई
- माजी नगरसेवक, नवी मुंबई म. न. पा.

विविध संस्थेतील पदे :
- मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने शिवसेना शाखा प्रमुखपदी निवड झाल्यावर प्रभागामध्ये शिवसैनिकांच्या सोबत काम करून नवी मुंबई महानगरपालिकेत २००५ मध्ये नगरसेवक म्हणून जनतेच्या आशिर्वादाने निवडून आलो.
- मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने भारतीय विद्यार्थी सेना उपजिल्हा संघटक, नवी मुंबई नियुक्ती करण्यात आली. नवी मुंबईतील शिक्षण सम्राटांना आंदोलनाच्या माध्यमातून वटणीवर आणण्याचे काम करण्यात यशस्वी झालो.
- सदर पाच वर्षाच्या कामगिरीनंतर मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. श्री. संजयजी राऊत साहेब, शिवसेना नेते, मा. एकनाथजी शिंदे व शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. विजय चौगुले या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली 'शिवसेना बेलापूर विधानसभा शहर प्रमुख पदी' नियुक्ती करण्यात आली.

मा. विजय माने यांचा नगरसेवक पदावर असताना कार्याचा अहवाल (शाखा, प्रभाग क्र. ७८ नेरूळ, नवी मुंबई)...

पाणी पुरवठा
- सेक्टर १६ए व सेक्टर १६, सेक्टर १८ मधील लहान व्यासाची जलवाहिनी बदलून नवीन मोठ्या व्यासाची जलवाहिनी बसविण्याचे काम पूर्ण केले. त्यामुळे पाणी पुरवठा योग्य प्रमाणात सुरु आहे.
- सेक्टर १८ येथे २५० मी. मी. व्यासाची जलवाहिनी टाकली.

पदपथ व रस्ते दुरुस्ती
- नेरूळ सेक्टर १६ ए नवी मुंबई म. न. पा. शाळा क्र. ६ च्या दक्षिण बाजूस पदपथ तयार करण्यात आला.
- नेरूळ सेक्टर १८ येथील नियोजित गार्डनच्या संरक्षक भिंतीचे व आतील क्षेत्राची सुधारणा करण्यात आली.
- नेरूळ सेक्टर १६ येथे महालक्ष्मी सोसायटी व अष्टविनायक सोसायटी मधील रस्त्याच्या दोन्ही बाजूस पदपथाची सागर दर्शन सोसायटीपर्यंत सुधारणा करण्यात आली.
- नेरूळ सेक्टर १८, जय भवानी को. ऑप. हौ. सोसायटी व सह्याद्री सोसायटीचा पदपथ तयार करण्यात आला.
- नेरूळ सेक्टर १८, शिवप्रसाद सोसायटी, शिवसागर सोसायटी, साई प्रेरणा सोसायटीच्या दक्षिण बाजूस पदपथ तयार करण्यात आला.
- सेक्टर २४ मधील रस्त्याचे डांबरीकरण केले.
- नेरूळ सेक्टर १८ अजिंक्यतारा सोसायटी ते मार्केट व सेक्टर १६ येथे न्यू मंगलमुर्ती सोसायटी, अष्टविनायक सोसायटी पर्यंतच्या पदपथाची दुरुस्ती करण्यात आली.
- नेरूळ सेक्टर १८ दिपसागर सोसायटी ते पारिजात सोसायटी पर्यंत पदपथ तयार करण्यात आला.
- नेरूळ सेक्टर १८ वजीरानी स्पोर्ट क्लब ते महालक्ष्मी हौसिंग सोसायटी पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण व पदपथ दुरुस्ती करण्यात आली.
- नेरूळ सेक्टर १८ सागर स्वीट समोरील भूखंडास संरक्षक भिंत व परिसराची सुधारणा करण्यात आली.
- नेरूळ सेक्टर १८ चिंतामणी सोसायटी येथे पदपथ तयार करण्यात आला.

स्वच्छता व आरोग्य विभाग
- नेरूळ सेक्टर १८ येथील सार्वजनिक गणेश उत्सव मैदानावरील रोडची दुरुस्ती व मलनिस:रन वाहिनी मोठ्या व्यासाची टाकण्यात आली.
- नेरूळ सेक्टर २४ मलनिस:रन वाहिनी मोठ्या व्यासाची टाकण्यात आली.
- प्रभागामध्ये विविध प्रसंगी रक्तदान, नेत्रदान व इतर मोफत वैद्यकीय शिबिरांचे अनेक वेळा यशस्वी आयोजन.
- नाममात्र दरात रुग्णवाहिका सेवा सुरु केली.

वीज
- सेक्टर १६ व १८ येथे मिनी हायमास्ट व नवीन दिवाबत्ती बदलण्यात आली.
- सेक्टर १६ ए व सेक्टर २४ येथे नवीन दिवाबत्ती लावण्यात आली.
- नवीन वीज भरणा केंद्र चालू केले.

नामकरण...
- सेक्टर १६ व १८ मधील चौकास "महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर" चौक असे नामकरण करण्यात आले.
- सेक्टर १६ मधील मैदानास "छत्रपती संभाजी राजे मैदान" असे नामकरण करण्यात आले.
- सेक्टर १८ मधील पुणे विद्याभवन शाळेसमोरील उद्यानाला "स्व. धर्मवीर आनंद दिघे उद्यान" असे नामकरण करण्यात आले.
- सेक्टर २४ मधील मार्गाला "संत वामनभाऊ व संत भगवान बाबा मार्ग" असे नामकरण करण्यात आले.
- सेक्टर १६ येथील खाली भूखंडास "सार्वजनिक उत्सव मैदान" असे नामकरण करण्यात आले.
- सेक्टर १८ येथील फेरीवाला भूखंडास "स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे भाजी मंडई" असे नामकरण करण्यात आले.
- पुणे विद्याभवन व पारिजात मधील रस्त्याला "स्व. कै. यशवंत ज्ञानदेव शिंदे मार्ग" असे नामकरण करण्यात आले.
- सेक्टर १६ मधील रस्त्याला "साई मंदिर मार्ग" असे नामकरण करण्यात आले.
- सागर दर्शन टॉवर व सी ब्रिज टॉवर मधील चौकाला "छत्रपति शिवाजी महाराज चौक" असे नामकरण करण्यात आले.
- अजिंक्यतारा सोसायटी ते भाजी मार्केट रोडला "दत्त मंदिर रोड" असे नामकरण करण्यात आले.
- सेक्टर १८ मधील भूखंडास "अनिरुद्ध बापू मैदान" असे नामकरण करण्यात आले.
- सेक्टर १६ ए मधील भूखंडास "स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यान" असे नामकरण करण्यात आले.
- सेक्टर १६ ए मधील रोडचे "स्व. संजय कुमार गोरड" असे नामकरण करण्यात आले.
- सेक्टर १६ ए Daily Needs समोरील मार्गाला "गणेश मंदिर मार्ग" असे नामकरण करण्यात आले.

धार्मिक व सांस्कृतिक विभाग...
- सेक्टर १६, सेक्टर १८, सेक्टर २४, सेक्टर १६ ए मध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व होळी इ. धार्मिक उत्सवांचे आयोजन.
- प्रभागामध्ये दरवर्षी महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन.
- अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन.

क्रीडा...
- विभागामध्ये क्रिकेट, कबड्डी, हॉलीबॉल इत्यादी विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन.

शैक्षणिक विभाग...
- विभागामध्ये गुणवंत विद्यार्थांचा गुणगौरव करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन केले.
- गरजू तसेच गरीब विद्यार्थांना मोफत वह्या तसेच इतर शैक्षणिक साहित्यांचे वाटप.
- विभागातील शाळांच्या फी संदर्भात अनेक वेळा पालक आणि शाळा व्यवस्थापनाबरोबर यशस्वी चर्चा.

बेरोजगारी व आर्थिक विभाग...
- विभागातील अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न.
- विभागातील जनतेला अल्पबचतीचे महत्व पटवून देऊन छोट्या-छोट्या प्रमाणात बचत करण्यास उत्तेजन.
- महिलांना स्वयंरोजगार योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन वाटप तसेच मोफत शिलाई शिकवणीचे वर्ग उपलब्ध केले.
- महिलांचे स्वतंत्र अल्पबचत गट स्थापन करण्यास प्रोत्साहन.


आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    5 1 vote
    Article Rating
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x