|  Uddhav Thackeray

uddhav-thackeray-200x200
shivsena-200x200

Name : 

उद्धव बाळासाहेब ठाकरे

Preceded by

बाळासाहेब ठाकरे

Party Name :

शिवसेना

Designation : 

महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री

E-mail :

digitalshivsena@gmail.com

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : उद्धव बाळासाहेब ठाकरे

Father's Name : बाळासाहेब ठाकरे

Mother's Name : मीना ठाकरे

Date of Birth : २७ जुलै १९६०

Place of Birth : मुंबई, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse's Name : रश्मी उद्धव ठाकरे

No.of Childrens : ०२, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे

Education : उद्वव ठाकरे यांनी आपले शिक्षण बालमोहन विद्यामंदिर मधून केले   |   मुंबईतील सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मधून पदवी मिळवली.

Profession : एक सिद्धहस्त लेखक आणि व्यवसायिक छायाचित्रकार

Permanent Address : मातोश्री, कलानगर, बांद्रा पूर्व, मुंबई ४०००५१, महाराष्ट्र

Phone No. : 022-22025151 / 022-22025222

राजकीय कारकीर्द
- आरंभीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते.
- निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे.
- २००२ साली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांत शिवसेनेला विजयश्री व त्यासह सत्ताही लाभली.
- २००३ मध्ये पक्षाने त्यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आणि २००४ मध्ये त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून घोषीत केले.
- २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाशी युती न करता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आणले.
- २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजप बरोबर युती करून निवडणूक लढवली व ५६ आमदार निवडून आणले.
- उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय सोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केले व २८ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्याच्या १९ व्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली.
- १४ मे २०२० उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली.

पक्षीय नेतृत्व
- शिवसेनेची हिंसक संघटना अशी प्रतिमा बदलून सुसंघटित पक्ष अशी नवीन ओळख देण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले.
- एक उत्तम संघटित आणि सुसज्ज राजकीय पक्ष निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

छायाचित्रण
उद्धव ठाकरे हे निपुण छायाचित्रकार देखील आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांची यशस्वी छायाचित्र प्रदर्शने आहेत. त्यांनी "महाराष्ट्र देशा" (2010) आणि "पहावा विठ्ठल" (2011) नावाची दोन छायाचित्रांची पुस्तके देखील प्रकाशित केली आहेत. या पुस्तकांमध्ये महाराष्ट्राचे पैलू आणि पंढरपूर यात्रेतील वारकऱ्यांचे चित्रण आहे.

महाराष्ट्र देशा
पहावा विठ्ठल
हे दोन्ही छायाचित्र संग्रह आहेत. महाराष्ट्र देशामध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचे गड किल्ले आणि त्यांच्याही शेकडो वर्षे आधीच्या किल्ल्यांची एरियल फोटोग्राफी केली आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी हे फोटो घेतले असून या दरम्यान एकदा त्यांचा सेफ्टी बेल्टही निसटला होता मात्र सुरक्षितपने त्यांनी फोटोग्राफी केली. पहावा विठ्ठल मध्ये महाराष्ट्राची सर्व धर्म जातींना एकत्र घेऊन जाणारी, सर्वांना समतेचे तत्त्वज्ञान शिववणारी भागवत धर्माची सांस्कृतिक परंपरा असलेली विठ्ठलाच्या वारीचे छायाचित्रण आहे. यामध्येही ठाकरे यांनी एरियल फोटोग्राफीला प्राधान्य दिले आहे. पुणे जिल्ह्यात दिवाघाटात जगतगुरू तुकोबा महाराज यांच्या पालखी सोबतच्या लाखो भाविकांचे छायाचित्र घेताना भारताच्या नकाशाची आठवण होईल असे छायाचित्र घेतले आहे

यशस्वी नेतृत्व
- शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवसेनेला अधिक सर्वसमावेशक करतानाच आधुनिकतेशी त्यांनी शिवसेनेला जोडले.
- युवक, कामगार आणि शेतकरी यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्यभर चालविलेल्या विविध आंदोलनांना यश आले.
- ८० टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धोरणाने कार्य करणाऱ्या शिवसेनेच्या समाजकारणाची दखल गिनीज बुकने घेतली आहे.
- श्री. ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मलेरिया आजारासाठी चाचणी आणि उपचार केंद्र सुरू करून गरजूंसाठी औषध पुरवठाही सुरू केला.
- मुंबईमधील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने अनेक रूग्णालयांचे निर्माण.
- विविध रक्तदान महाशिबिरांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण समाजकार्याची पायाभरणी.
- २००२ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी आणि विजयाचे शिल्पकार.
- महाराष्ट्रात पक्षविस्तार केल्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश.
- गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील आणि केंद्रातील सरकारांमध्ये शिवसेना एक प्रमुख घटकपक्ष म्हणून सहभागी.
- राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला भरघोस यश.
- राज्य आणि केंद्र शासनाकडून आवश्यक ती मदत न मिळाल्याने श्री. उद्धव ठाकरे यांनी २००७ मध्ये विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी यशस्वी मोहीम राबवली.
- श्री. उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कल्याणावर लक्ष केंद्रीत करीत आपल्या पक्षाचा विस्तार वाढविला आणि राज्यानेही त्यांचे नेतृत्व स्वीकारले.
- संवेदनशील लेखक, कवी, अभ्यासू आणि छायाचित्रकार असलेल्या श्री. उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणले आणि पक्षाला आजचे सुसंघटित रुप दिले. महाराष्ट्राला विविध आघाड्यांवर पुढे घेऊन जाणारे नेतृत्व श्री. उद्धव ठाकरे यांच्या रूपाने लाभले आहे.

Coming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

  0 0 votes
  Article Rating
  guest
  0 Comments
  Inline Feedbacks
  View all comments
  0
  Would love your thoughts, please comment.x
  ()
  x