|  Raigad  |  Shruti Mhatre

shruti-mhatre-200x200
Congresspartylog_1

Name : 

श्रुती शाम म्हात्रे

Constituency :

प्रभाग क्र. १५ ब, पनवेल महानगरपालिका

Party Name :

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

Designation : 

उपाध्यक्ष, रायगड जिल्हा महिला काँग्रेस कमिटी

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : श्रुती शाम म्हात्रे

Father's Name : शाम पदाजी म्हात्रे

Mother’s Name : रीना शाम म्हात्रे

Date of Birth : २८ नोव्हेंबर, १९८७

Place of Birth : मुंबई, महाराष्ट्र

Marital Status : अविवाहित

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्लिश

Education : बी. आर्किटेक्चर, एम. आर्किटेक्चर (अर्बन डिझाईन)

Profession : आर्किटेक्चरल फर्म

Hobby : सामाजिक कार्य

Residence Address : एच ६ : १, गार्डन व्हू सोसायटी, सेक्टर ८, खांदा कॉलनी (पश्चिम), नवीन पनवेल, ता. पनवेल, जि. रायगड ४१० २०६

Office Address : श्री गणेश प्लाझा, फेज - १, शॉप नं. १७, सेक्टर १, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, ता. पनवेल, जि. रायगड ४१० २०६

Phone No. : कार्यालय फोन नं.: +91 022 7666723236 / कार्यालय फॅक्स : 022 27450002 / मो. 9930028450

राजकीय कारकीर्द
उपाध्यक्ष, रायगड जिल्हा महिला काँग्रेस कमिटी

सध्या भूषवित असलेली पदे
- अध्यक्षा, एकता कॅटॅलिस्ट
- उपाध्यक्षा, कोकण श्रमिक संघ
- चिटणीस, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ
- सहसचिव, धरमतरखाडी पेण-अलिबाग मच्छीमार संघर्ष समिती
- संचालिका, आगरी शिक्षण संस्था
- संचालिका, श्याम नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
- सदस्या, अखिल आगरी समाज परिषद
- सदस्या, वृंदावन बाबा ट्रस्ट
- सदस्या, महाराष्ट्र राज्य एम. आय. डी. सी. प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समिती

    • दि. २८ नोव्हेंबर हा दिवस म्हणजे महात्मा फुले यांचा स्मृती दिवस आहे. ज्यांनी आपल्याला मानवी हक्कांची जाणीव करून दिली. तसेच घरातूनच महिलेला शिक्षण घेण्यास पुढाकार दिला. अशा या महापुरुषाचा स्मृती दिवस योगायोगाने माझा जन्मदिवस, म्हणूनच हा दिवस माझ्या आयुष्यभरासाठी प्रेरणादायी आहे.

      सामाजिक कार्य
      समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचून या पुरोगामी महाराष्ट्राच्या समस्त महापुरुषांनी केलेल्या कामांचा वसा आणि वारसा यथाशक्ती पुढे चालविण्यासाठी एकता कॅटॅलिस्ट या संस्थेची स्थापना केली.
      परिसरातील होतकरू तरुणाईसाठी एम.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी. या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी कॅटॅलिस्टच्या माध्यमातून प्रशिक्षण वर्ग सुरु केले.
      भारत सरकारच्या पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत पनवेल-उरण परिसरातील किमान शिक्षण घेतलेल्या होतकरू विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
      याचाच परिणाम म्हणजे सिडको अस्थापनेवरील २४ प्रकल्पग्रस्त इंजिनियर्स आणि आर्किटेक्स यांना विशेष प्रशिक्षण लाभल्याने सिडकोच्या वतीने आलेल्या परीक्षा ते उत्तीर्ण होऊन आजमितीस कायमस्वरूपी सिडको मंडळाच्या सेवेत कार्यरत आहेत.
      आगरी समाजातील गोरगरीब आणि प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण नाममात्र शुल्कात मिळवून देण्यासाठी खांदा कॉलनी, पनवेल येथे आगरी शिक्षण संस्था कार्यरत आहे, या संस्थेच्या मंडळावर लोकशाही मार्गाने संचालिका या पदावर माझी निवड झालेली आहे.
      लोकशाही समृद्ध बनण्यासाठी विद्यार्थी दशेतच मतदानाचे हक्क व अधिकार या विषयी जाणीव जागृती निर्माण करणे, त्यांच्यात संविधानिक मूल्यांची जोपासना करणे अत्यावश्यक आहे. ह्या बाबीवर मी विशेष प्राधान्याने काम करायचे ठरविले आहे.

      पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम
      काँग्रेस पक्षाची महिला आघाडी अधिक सक्षम व्हावी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठांच्या अशा आदेशानुसार मी अनेक जनआंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.
      मोदी सरकारच्या फसव्या नोटबंदी धोरणा विरोधात थाली बजाव, घंटानाद असे स्वतंत्र कार्यक्रम पनवेल काँग्रेस कमिटीच्या वतीने घेण्यात पुढाकार घेतला.
      रायगड जिल्ह्यातील वेळोवेळी झालेल्या अनेक कार्यक्रमांमधून सक्रिय सहभाग घेतला.
      पनवेल परिसरातील महिलांना एकत्रित करण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाचा संदेश देण्यासाठी हळद कुंकू या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला.

Coming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    0 0 votes
    Article Rating
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x