|  Raigad  |  Rohit Dudwadkar

rohit-dudwadkar-200x200
1280px-MNS-rajmudra-Flag

Name : 

रोहित बाळकृष्ण दुदवडकर

Constituency :

188, पनवेल विधानसभा मतदार संघ

Party Name :

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Designation : 

कामोठे शहर अध्यक्ष, मनसे

E-mail :

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : रोहित बाळकृष्ण दुदवडकर

Father's Name : बाळकृष्ण नारायण दुदवडकर

Mother’s Name : अरुंधती बाळकृष्ण दुदवडकर

Date of Birth: : १८ ऑगस्ट, १९८७

Place of Birth: : मुंबई, महाराष्ट्र

Marital Status : अविवाहित

Spouse’s Name : -

No. of Children : -

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : T.Y.B.Sc. Computer Science

Profession : सायबर कॅफे आणि टूर्स व ट्रॅव्हल्स

Hobby : वाचन, ट्रेकिंग

Residence Address : डी - ३०२, चॅनेल स्टार सोसायटी, प्लॉट नं १५, सेक्टर - १६, कामोठे, नवी मुंबई

Office Address : त्रिमूर्ती पॅराडाईस, शॉप नं १२, प्लॉट नं १६, सेक्टर - १६, कामोठे, नवी मुंबई

Phone No. : +91 9870873982

राजकीय कारकीर्द
शहर अध्यक्ष, कामोठे शहर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
सन २०१२ ते २०१३ - उप विभागअध्य्क्ष, कामोठे शहर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
9 March 2006 महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या स्थापनेपासून एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्यरत...

इतर पदे
सदस्य - शिवसृष्टी प्रतिष्ठान
सदस्य - श्री सदगुरु साई धाम सेवा मित्र मंडळ

    • समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
      - कामोठे मधील रहिवासीयांना येणाऱ्या समस्यांवर, तक्रारींवर निवारण.
      - शहरातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून कामे कार्यरत केली.
      - शासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.
      - पायाभूत सुविधांबरोबरच नवनिर्माण योजना व सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे.
      - बेरोजगारांसाठी, युवकांसाठी रोजगार मेळावे यांचे आयोजन.

      पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम...
      - शिवसृष्टी प्रतिष्ठान तर्फे स्थानिक नागरिकांना ५००० दिनदर्शिकेचे मोफत वाटप.
      - श्री सदगुरु साई धाम सेवा मित्र मंडळ, गोवंडी येथील साई भंडारा व पालखी च्याआयोजनात सहभाग.
      - दरवर्षी महाष्ट्राचे आराध्य दैवत श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे व मिरवणुकीचे आयोजन.
      - सहकारी मित्रांच्या मदतीने कामोठे शहरात मोफत वाचनालयाचे उदघाटन व शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन.
      - शिवसृष्टी प्रतिष्ठान तर्फे दही हंडी उत्सवाचे आयोजन.
      - दरवर्षी गणेशोत्सवविसर्जन दरम्यान गणेश भक्तांना मोफत स्वरूपात पाणी वाटप केंद्रांची व्यवस्था करण्यात येते.
      - २६/११ मधील शहिदांच्या स्मरणार्थ " रक्तदान शिबीर " चे आयोजन
      - दिवाळीनिमित्त स्वस्त दरात चॉकलेट विक्री केंद्रांचे आयोजन.
      - कामोठेतील नागरिकांसाठी सायन- पनवेल द्रुतगती मार्गालगत " बस थांबा " ची व्यवस्था करण्यात आली.
      - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी चौकामध्ये कार्यक्रमाचे आयोजन.
      - सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठे शहरात वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.
      - नवी मुंबई पोलीस दलातर्फे राबविण्यात आलेल्या गडचिरोली येथील आदिवासी व गरीब लोकांना सहकार्य करण्याच्या उपक्रमास मदतीचा हात म्हणून मनसेतर्फे तेथील आदिवासी व गरीब लोकांना भेट म्हणून जेवणाची नविन भांडी, घरगुती दैनंदिन वापरातील जुने व नवीन कपडे तसेच खेळणी देण्यात आली.

      निवेदने व मोर्चे यामध्ये सहभाग
      - ओव्हरलोडींग विरोधात वाशी आर. टी. ओ. येथील आंदोलनात सहभाग.
      - सन्मा. राजसाहेबांच्या नेतृत्वात " पोलिसांना झालेल्या मारहाणी विरोधातील " निषेध मोर्चात सहभाग.
      - कामोठे शहरातील एम. एन. आर. शाळेतील विद्यार्थिनीवर पंखा पडल्याने, विद्यार्थ्यांचा जीव शाळा टांगणीस लावत आहे हे लक्षात येताच. या संदर्भात म.न.से., म.न.वि.से. व महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत शाळेवर मोर्चा काढून त्यांना जाब विचारण्यात आला.
      - कामोठे शहरातील समस्यांबाबत सिडकोला निवेदन देऊन जाब विचारण्यात आला.
      - कामोठे शहरातील चौकांमधील सी.सी.टी.व्ही. दुरुस्त करण्याबाबत मा. ग्रामसेवक यांचा निवेदन देण्यात आले.
      - खान्देश्वर व मानसरोवर रेल्वे स्थानकात अतिरिक्त तिकीट खिडकी चालू करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली व इतर मुलभूत सुविधांच्या कमतरते संदर्भात वरिष्ठ डी.सी.एम. साहेब यांना लेखी निवेदन देण्यात आले.
      - मनसे रायगड जिल्हाअध्यक्ष यांच्या नेतृत्वात जे. एन. पी. टी. विरोधातील मोर्चात सक्रिय सहभाग.
      - शेडुंग टोल नाका बंद करण्यासाठी रायगड जिल्याच्यावतीने टोल नाक्यावर धडक मोर्चा काढण्यात आला त्यावेळी पोलिसांकडून अटक करण्यात आली.
      - सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार टोल विरोधात कामोठे येथे द्रुतगती मार्गावर रस्ता रोको करण्यात आला त्यावेळी पोलिसांकडून अटक करण्यात आली व जामिनावर सुटका झाली.
      - कामोठे येथे सेक्टर २१ येथे पथदिवे लावण्यासंदर्भात सिडकोला निवेदन देण्यात आले व त्यावर लगेचच सिडकोतर्फे पथदिवे लावण्यात आले.
      - कामोठे शहरच्यावतीने , उप प्रभाग अध्यक्ष श्री. चव्हाण यांच्या सूचनेवरून से. ३६ येथील संत तुकाराम महाराज मंदिराच्या परिसरात अश्लील चाळे करणाऱ्यांच्या विरोधात कामोठे पोलिस ठाणे येथे निवेदन देण्यात आले.
      - मनसे रायगड जिल्हाच्या वतीने कामोठे - खारघर येथील होणार्या टोल नाक्याविरोधात , टोल नाका बंद करण्याकरिता मनसेतर्फे टोल अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
      - कामोठे येथील पोस्ट कार्यालयाकरिता मागणी करण्याचे निवेदन डाक अधिक्षक साहेब यांना देण्यात आले व आजही त्याचा पाठपुरावा चालू आहे.
      - नव्याने चालू झालेल्या खारघर टोल नाक्यांविरोधात घेण्यात आलेल्या घंटानाद आंदोलनात सक्रिय सहभाग.
      - अहमदनगर येथील जावखेड तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा निषेद व्यक्त करण्यासाठी कामोठे येथे झालेल्या सर्व पक्षीय मुक मोर्च्यात सक्रिय सहभाग.
      - कामोठे - मानसरोवर येथे बस व्यवस्था चालू करण्यासाठी सहकाऱ्यांबरोबर सक्रिय पुढाकार.
      - कामोठे शहरातील अपुऱ्या व अनियमित पाणी पुरवठ्याविषयी स्वाक्षरी मोहीम घेऊन पाणी पुरवठा विभागाला निवेदन देण्यात आले.
      - मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महागाई विरोधात आंदोलन छेडन्यात आले व तालुक्याच्यावतीने मा. तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले त्यामध्ये सक्रिय सहभाग.
      - दुर्गंधीयुक्त मोकळ्या भूखंडाची स्वच्छता करण्याबाबत सिडको अधिकारी यांना लेखी स्वरूपात निवेदन देऊन प्रत्यक्ष उभे राहून भुखंड स्वच्छ करून घेण्यात आले.
      - खाजगी शालेय वाहनांची चौकशी व अनधिकृत वाहनांवर कारवाई करणेबाबत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
      - पोलिसांवर समाजकंटकांकडून होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ सर्व पक्षीय मोर्चा मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत सक्रिय सहभाग.

रोहित दुधवडकर यांचे छाया चित्र संग्रह...

coming soon


आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    0 0 votes
    Article Rating
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x