| Raigad | Ramji Bera
Name :
रामजी गेला बेरा
Constituency :
प्रभाग क्र. ५, खारघर, पनवेल महानगरपालिका
Party Name :
भारतीय जनता पार्टी
Designation :
मा. नगरसेवक प्रभाग क्र.५, पनवेल महानगरपालिका
E-mail :
- Personal Details
- Political Profile
- Achievement
- Photos
- नगरसेवक कामगिरी
- Message
Name : रामजी गेला बेरा
Father's Name : गेला गोविंद बेरा
Mother’s Name : जमना गेला बेरा
Date of Birth : १ जून, १९७०
Place of Birth : वोंध, कच्छ, गुजरात
Marital Status : विवाहित
Spouse’s Name : राजीबेन रामजी बेरा
No. of Children : ०२
Languages Known : हिंदी, इंग्रजी, गुजराती
Profession : सिव्हील वर्क
Hobby : सामाजिक कार्य, वाचन, प्रवास
Residence Address : मु. मुर्बी, पो. खारघर, घर क्र.८६३, ता. पनवेल जि. रायगड
Office Address : साई श्रद्धा, शॉप नं. ६, प्लॉट नं. १२७, सेक्टर १३, खारघर, ता. पनवेल जि. रायगड
Phone No. : +91 9819811423
राजकीय कारकीर्द
मा. नगरसेवक, पनवेल महानगरपालिका (प्रभाग क्र. 5 खारघर)
सामाजिक कार्य
श्री कच्छ वागड लेवा पाटीदार समाजाच्या वतीने खारघर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.
---------------------------
रक्तदान शिबीरे, आरोग्य शिबीरे, डोळे तपासणी तसेच मोफत चष्मे वाटप शिबिरांचे आयोजन.
---------------------------
६ ऑक्टोबर २०२१ रोजी पनवेल महानगरपालिका प्रभाग ५ मधील नगरसेवक रामजीभाई गेला बेरा यांच्या माध्यमातून खारघर सेक्टर १२ मधील गिरिजाघर आश्रमातील ३५ मुले व आशालय बालगृहातील ४५ मुलामुलींना फळवाटप करण्यात आले.
---------------------------
प्रकल्प ग्रस्तांना मदतीसाठी नेहमी तत्पर.
---------------------------
सफाई कामगारांसाठी त्यांचे सर्व अडचणी, मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलनात सक्रीय सहभाग व त्यांना नेहमी मार्गदर्शन.
---------------------------
गुणवंत विद्यार्थांना प्रोत्साहन मिळावे म्हणून गुणगौरव सोहळ्याचे आयोजन.
---------------------------कोरोना काळातील कामगिरी
कोरोना काळात गरजूंना आपल्याकडून मदत व्हावी, या प्रामाणिक दृष्टिकोनातून पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक रामजी बेरा यांनी प्रभाग क्रमांक ५, खारघर परिसरामध्ये आपले योगदान दिले. कोरोना व ‘लॉकडाऊन’मुळे गरीब कुटुंबांवर भीषण परिस्थिती उद्भवली. यावेळी बेरा यांनी स्वत:च्या मदतीसह रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली मदतही प्रभागात दिली.
---------------------------
पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर परिसर हा उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू लोकांची ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळखला जात असला, तरी या परिसरात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारी अनेक कुटुंबे आहेत. कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’ जाहीर केल्यावर, या लोकांचा रोजगार बंद झाला. त्यामुळे रोज कमवून खाणार्या कुटुंबांची उपासमार होऊ लागली. यावेळी अनेकजण प्रभाग ५ मधील नगरसेवक रामजी बेरा यांना भेटून ‘आमच्यासाठी काही तरी करा, आम्हाला मदत मिळवून द्या’ म्हणून विनंती करू लागले. त्यावेळी रामजी बेरा यांनी त्यांना स्वत: धान्य वाटप केले.
---------------------------
नगरसेवक रामजी बेरा यांनी आपले कार्यकर्ते आंबाभाई पटेल, दीपक शिंदे, अनिल साबणे, रमेश पटेल, वालजी पटेल आणि इतरांमार्फत खारघरमधील सेक्टर १२ मधील सोसायटीतील गरीब आणि गरजू नागरिकांची माहिती गोळा केली. त्यांना एकाच वेळी न बोलवता, प्रत्येकाला वेळ देऊन त्या ठिकाणी जाऊन मदतीचे वाटप केले.
---------------------------
कोरोना विषाणु च्या पार्श्वभूमी वर नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी आर्सेनिक अल्बम ३० ह्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
--------------------------
सेक्टर १३ मध्ये मजुरी करणारे आणि घरकाम करणार्या महिला मोठ्या प्रमाणात राहतात. त्यांना सोसायटीत प्रवेश बंद केल्याने त्यांचे काम बंद झाले होते. त्याचा परिणाम त्यांना घरात खायचे वांदे झाले होते. अशा लोकांना धान्याच्या किट ज्यामध्ये डाळ, तांदूळ, तेल, मीठ, गव्हाचे पीठ आणि कांदे-बटाटे असलेले आपल्या कार्यकर्त्यांमार्फत वाटप केले.
--------------------------
सोसायटीमध्ये राहणारे काही नागरिक नोकरी गेल्याने घरात काही नसल्याने अत्यंत वाईट अवस्थेत होते. त्यांच्या घरात खायलाही काहीच नव्हते. पण, सोसायटीत चांगल्या घरात राहत असल्याने ते असे धान्याच्या किट घ्यायला येऊ शकत नव्हते. अशा लोकांची माहिती मिळाल्यावर नगरसेवक रामजी बेरा यांनी स्वत:च्या गाडीतून धान्याच्या किट नेऊन त्यांना दिल्या.
--------------------------
कोरोनापासून सुरक्षा म्हणून एक हजार मास्कचे वाटप, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सॅनिटायझरचे वाटप, रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून १२०० बॉटल्स ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे वाटप केले. याशिवाय त्यांनी आपले दोन महिन्यांचे मानधन महापौर निधीला दिले.
--------------------------
रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘मोदी भोजन कम्युनिटी किचन’च्या माध्यमातून दररोज हजारो लोकांना तयार अन्न देण्याचे काम केले जात होते. त्याचा जवळपास १ लाख, २० हजार नागरिकांना लाभ झाला.
--------------------------
रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘मोदी भोजन कम्युनिटी किचन’च्या माध्यमातून दररोज हजारो लोकांना तयार अन्न देण्याचे काम केले जात होते. त्याचा जवळपास १ लाख, २० हजार नागरिकांना लाभ झाला.
--------------------------वृक्षारोपण
लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा ७० वा वाढदिवस व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक व उद्योजक रामजीभाई गेला बेरा यांच्या कल्पनेतून व भारतीय जनता पार्टी खारघर मंडलाच्यावतीने ७० कडुलिंबाच्या झाडांचे वाटप करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
--------------------------समाजाला कशा प्रकारे मदत करू शकता ?
युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणे.
--------------------------
शिक्षणासाठी गरजू, गरीब विद्यार्थ्यांना शक्यतोपर मदत.
--------------------------
युवा - युवतींसाठी स्वयंरोजगारासाठी मदत / सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी मदत.
--------------------------
गरजूंना आर्थिक, सामाजिक व कायदेविषयक सहाय्य प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीतीने करता येईल तसेच समाजाला ज्या ज्या वेळी आपली मदत लागेल त्या त्या वेळी आपल्या परीने मदत केली जाईल.पक्षाच्या व संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम -
महावितरणाने ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या महाआघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी आज खारघर - तळोजा मंडळ येथील महावितरण कार्यालयावर टाळे ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
--------------------------
खारघर मॅरेथॉन या भव्य स्पर्धेमध्ये आपल्या सहकारी नगरसेवकांसोबत सहभाग घेतला.या स्पर्धेला नागरिकांचाही उत्फुर्त प्रतिसाद मिळाला व १५,००० पेक्षा जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला.
--------------------------
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांचे नांव द्यावे, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी व प्रभागातील नागरिकांनी उभारलेल्या लढ्याच्या दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाची जनजागृती व्हावी, यासाठी "९ ऑगस्ट" या क्रांतिदिनीं "मशाल मोर्चा" काढण्यात आला. मोर्चात सक्रिय सहभाग घेतला.
--------------------------
निवडणुकीत प्रचारात भव्य बाईक रेलीत सक्रीय सहभाग.
--------------------------
पक्षातील युवकांना, कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन.
--------------------------
निवडणुकीत प्रचारात सक्रीय सहभाग.
--------------------------
पक्ष वाढीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन.
--------------------------
पक्षातील सर्व विविध सामाजिक, शैक्षणिक, तसेच आंदोलनातील कार्यक्रमात सक्रीय सहभाग.
रामजी गेला बेरा यांचे छाया चित्र संग्रह...
माझा प्रभाग, माझी जबाबदारी... प्रभागात केलेली विकासकामे...
नगरसेवक निधीतून खारघर सेक्टर ६ येथील मैदानात ओपन जिम ची साधने बसविण्यात आली. तसेच याच मैदानात जेष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड देखील उभारण्यात आला.
---------------------------
कोरोना काळात खारघरमधील सेक्टर १२ मधील नाका कामगारांचे पुढाकार घेऊन मोफत लसीकरण करून घेतले.
---------------------------
कोरोनाने मृत्युमुखी पावलेल्या कुटुंबियांबाबत पालिकेने धोरण राबविण्यासाठी महासभेत लक्षवेधी मांडली.
---------------------------
---------------------------
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रणाम हॉटेल ते उत्कर्ष हॉल मधील रस्त्याच्या कामाला प्रारंभ करून पूर्ण करण्यात आले.. सततच्या पाठपुराव्याला यश.
---------------------------
आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...
Good work Sir…