|  Ramdas Athawale

ramdas-athawale
rpi-athawale

Name : 

रामदास  बंडू आठवले

Constituency :

पंढरपूर लोकसभा मतदार संघ

Party Name :

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)

Designation : 

अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)

E-mail :

rpistw@gmail.com

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : रामदास बंडू आठवले

Father's Name : बंडू बापू आठवले

Mother's Name : हौसाबाई आठवले

Date of Birth: : २५ डिसेंबर, १९५९

Place of Birth: : अगलगाव, सांगली जिल्हा, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse's Name : सीमा आठवले

No.of Childrens : ०१, जीत

Education : सिद्धार्थ कॉलेज, मुंबई, महाराष्ट्र येथे पदवीपूर्व शिक्षण

Profession : राजकीय व सामाजिक कार्यकर्ता, औद्योगिक कामगार / ट्रेड युनियनिस्ट, पत्रकार / लेखक, प्रकाशक आणि खेळाडू

Permanent Address : 647, 'संविधान' गांधी नगर, जवळ. गुरू नानक हॉस्पिटल, बांद्रा (पूर्व), मुंबई 400051

Phone No. : {022} 26455164, 22656099, Mobile: 09004809627

राजकीय कारकीर्द
- भारत सरकारचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री आहेत.
- भारताचे वरिष्ठ सभागृह राज्यसभेचे सदस्य आहेत.
- भारताच्या १४ व्या लोकसभेचे खासदार
- राष्ट्रीय अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)
- अध्यक्ष, रेल मजदूर युनियन
- उपाध्यक्ष, World Buddhist Fellowship
- खासदार, राज्यसभा

जीवन प्रवास थोडक्यात
इ.स. १९७१ मध्ये मुंबई गाठली.
इ.स. १९७२ मध्ये दलित पॅंथरची स्थापना झाली व ते पॅंथर्समध्ये सक्रिय झाले. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ती व सहकारी मंडळी होती. पॅंथर्समुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्यांच्यात पॅंथर्सचा झंझावात निर्माण झाला.

विद्यार्थिदशेपासून अन्याय, अत्याचाराविरोधात लढले . वडाळ्यातील सिद्धार्थ विहारमध्ये महाराष्ट्रातील अनेक दलित आणि मागासवर्गीय समाजातील मुले शिक्षण घेण्यासाठी येत असत. हे वसतिगृहच गोरगरिबांचे आधारस्थान होते. येथे चळवळीविषयी खूप चर्चा होत असत. पुरोगामी आणि दलित चळवळीतील अनेक मान्यवरांची भाषणे आणि व्याख्याने ऐकण्यासाठी जात असत. हळूहळू लोकांशी संपर्क वाढत होता. प्रा. अरुण कांबळेेंचे त्यांना वैचारिक पाठबळ मिळाले. दलित पॅंथर्सच्या चळवळीत सक्रिय झाल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पालथा घातला.

जेथे जेथे दलितांवर अन्याय आणि अत्याचार होत असे तेथे तेथे ही पॅंथर्स धावून जात होते. अन्यायाविरोधात पॅंथर्सच्या माध्यमांतून त्यांनी आवाज बुलंद केला. त्यांच्या आंदोलनाची भल्याभल्यांनी धडकी घेतली होती. महाराष्ट्रात भटकंती करीत असताना दलित समाजाबरोबरच कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, भटक्या आणि फाटक्या माणसांची दुःखही कळली. दलित समाज त्यांना ओळखू लागला.
पुढे नामांतर आंदोलनात मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे ही मागणी जोर धरू लागली. त्या नामांतर चळवळीतही रामदास आठवले सहभागी झाले. “जोपर्यंत मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरण होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही”, असा त्यांनी निर्धार केला. तेव्हा संपूर्ण राज्यात वातावरण तापले.

नामांतराचा लढा काही वर्षे सुरू राहिला. शिवसेनेशी व सरकारशी त्यांनी संघर्ष केला. अनेक नेत्यांसह मोर्चे आणि आंदोलनात ते सहभागी झाले. शेवटी मराठवाडा विद्यापीठाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ’ असा नामविस्तार वा नामांतर झाले. तेव्हाचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार मुख्यमंत्री असताना हा ऐतिहासिक निर्णय झाला. मार्ग निघाला. आंदोलनाची सरकारला दखल घ्यावी लागली. आंदोलन, चळवळ आणि राजकारण सुरू असतानाच त्यांचा इ.स. १९९० मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळात समावेश झाला.

आठवलेंनी प्रारंभी महाराष्ट्राचे समाजकल्याण आणि परिवहन मंत्री म्हणून काम केले. पुढे आधी मुंबई आणि नंतर पंढरपूर या लोकसभा मतदार संघांतून ते खासदार झाले.

साहित्यिक कलात्मक आणि वैज्ञानिक पूरक :
- संपादक - भूमिका (साप्ताहिक मासिक), मुंबई
- प्रकाशक, परिवर्तन प्रकाशन
- संस्थापक सदस्य, परिवर्तन साहित्य महामंडळ
- अध्यक्ष, परिवर्तन कला महासंघ

अध्यक्ष
- डॉ बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन
- बौद्ध कलावंत अकादमी

आवड
वाचन, प्रवास, संगीत, सामाजिक आणि आर्थिक समस्यांवर चर्चा

खेळ आणि क्लब
क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, खो-खो, कबड्डी आणि कॅरम

भेट दिलेले देश
मोठ्या प्रमाणात प्रवास केला

इतर माहिती
- अध्यक्ष, रिपब्लिकन कर्मचारी फेडरेशन
- अध्यक्ष, म्युनिसिपल मजदूर संघ

Coming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    0 0 votes
    Article Rating
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x