||  Raj Thackeray

raj-thackeray-200x200
1280px-MNS-rajmudra-Flag

Name : 

राज श्रीकांत ठाकरे

President :

संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Party Name :

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Founded :

9 March 2006

E-mail :

mnsblueprint | हो, हे शक्य आहे

Name : राज श्रीकांत ठाकरे

Father's Name : श्रीकांत सीताराम ठाकरे

Mother’s Name : मधुवंती श्रीकांत ठाकरे

Date of Birth: : १४ जून, १९६८

Place of Birth: : मुंबई, महाराष्ट्र, भारत.

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. शर्मिला ठाकरे

No. of Children : एकूण २, अमित ठाकरे, उर्वशी

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : कला पदवीधर सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई

Profession : संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Hobby : व्यंग्यचित्रकार, चित्रपट निर्मिती व फोटोग्राफी

Office Address : रायगड मध्यवर्ती कार्यालय, मातोश्री टॉवर, दुसरा मजला, पदमाबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (प.), मुंबई, महाराष्ट्र ४०००१६

Phone No. : दूरध्वनी +९१ २२ २४३३३५९९, +९१ २२ २४३३३७९९, फॅक्स : +९१ २२ २४३३३८९९

राजकीय कारकीर्द
संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

थोडक्यात राज ठाकरे यांच्या बद्दल...
- शिवसेनेचे प्रमुख बाळ ठाकरे यांचे ते पुतणे आहेत.
- महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचे धोरण महाराष्ट्र व मराठीभाषा यांभोवतीच प्रामुख्याने केंद्रित ठेवले आहे.
- महाराष्ट्रात सर्व नेत्यांपैकी गुगलवर सर्वात जास्त सर्च होणारे नेते म्हणून इंटरनेटच्या विश्वातही त्यांचा दबदबा आहे.
- राज ठाकरे हे तरुणांमध्ये जास्त लोकप्रिय आहेत.असे म्हटले जाते कि महाराष्ट्रातील मराठी नागरिक जास्तित जास्त अपेक्षा राज ठाकरे या व्यक्तीकडून ठेवतात.
- राज ठाकरेंचे ध्येय हे खूप मोठे आहे. "जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचाय" हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे.
- राज ठाकरे हे कधीच हार न मानणाऱ्यांपैकी एक ओळखले जातात.
- त्यांचा पक्षाचा एकमेव आमदार असतानाही ज्याप्रकारे राज ठाकरे हे काम करतात व सत्ताधाऱ्यांनाही धडकी भरवतात अशी आज त्यांची ओळख आहे.

राज ठाकरे यांच्यावरील पुस्तकरूपाने प्रकाशित झालेले साहित्य
मराठी मनाचा राजा (लेखक - मनोज आवाळे)
ही राजभाषा असे (राज ठाकरे यांच्या निवडक भाषणांचा हा संग्रह, संपादक - ज्ञानेश महाराव आणि प्रवीण टोकेकर)

    • सामाजिक कार्य

      राज ठाकरे हे नेहमीच जनतेसाठी शेवटचा पर्याय म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांचे प्रचारसभेत मुद्दे हे नेहमीच विकासाचे असतात. भारतातील सर्वात सुंदर असा विकासाचा आराखडा निर्माण करण्याचे कामही त्यांच्याच नावावर नमूद आहे . त्यांच्या महाराष्ट्राच्या ब्लु प्रिंटमधील अनंत निर्णय मोदी सरकारने आस्तित्वात आणले व त्यावर कामही सुरु केले आहे.

      jet जेट एरवेज मधून जेव्हा अनेक मराठी कामगारांना कामावरून कमी करण्यात आले तेव्हा हे सगळे कामगार राज ठाकरे यांना भेटले व राज ठाकरेंनी पुन्हा त्या कामगारांना कव्हर रुजू करून घेतले.

      रेल्वे भरतीतील परप्रांतीय आंदोलन तर राज ठाकरेंच्या यशस्वी आंदोलनांपकी एक आहे.या आंदोलनामुळे महाराष्ट्र रेल्वेत अनेक तरुणांना नोकरी मिळाली.

      आझाद मैदानावरील शहीद स्मारकाची मोडतोड करून बिहारमार्गे नेपाळला पळून जात असलेल्या गुन्हेगाराला महाराष्ट्राच्या पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन पकडून आणले. ही बिहारमध्ये मराठी पोलिसांनी केलेली घुसखोरी आहे असा आरोप करून, या घटनेचा निषेध म्हणून बिहारच्या मुख्य सचिवाने महाराष्ट्र सरकारला खडसावून पत्र लिहिले. यावर उत्तर म्हणून राज ठाकऱ्यांनी ‘यापु्ढे महाराष्ट्रातील पोलिसांना कर्तव्य बजावताना बिहारमध्ये अडवलेत तर महाराष्ट्रातल्या एकेक बिहारी माणसाला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकलवून लावू’, अशी घोषणा केली.

      राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमध्ये मुंबईमध्ये येणाऱ्या लोंढ्यांवर लक्ष वेधले, मुंबई अगोदरच बकाल झाली असून हे लोंढे असेच येत राहिल्यास परिस्थिती अजून बिघडेल, असा इशारा देत त्यांनी उत्तर प्रदेशी व बिहारी लोकांवर आपला शाब्दिक हल्ला चढवला.

      राज ठाकरे यांनी इ.स. २००८ मध्ये केलेल्या अनेक आंदोलनात मुंबई व परिसरात नव्याने येत असलेल्या बिहारी व उत्तरप्रदेशी लोकांच्या लोंढाला आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले, त्यामुळे राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले.


आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x