| Raigad | Manoj Kothari
Name :
मनोज शांतीलाल कोठारी
Constituency :
188, पनवेल विधानसभा मतदार संघ
Party Name :
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Designation :
कामोठे शहर उपशहर अध्यक्ष
E-mail :
- Personal Details
- Political Profile
- Achievement
- Photos
- Videos
- Message
Name : मनोज शांतिलाल कोठारी
Father's Name : स्व. शांतिलाल भंवरलाल कोठारी
Mother’s Name : स्व. कांचनदेवी शांतिलाल कोठारी
Date of Birth: : २ जून, १९७८
Place of Birth: : मुंबई, महाराष्ट्र
Marital Status : विवाहित
Spouse’s Name : सौ. स्मिता मनोज कोठारी
No. of Children : १ मुलगा
Languages Known : हिंदी, मराठी, इंग्रजी, मारवाडी
Education : दहावी
Profession : ज्वेलर्स
Hobby : वाचन
Residence Address : २०२, निळकंठ अपार्टमेंट, प्लॉट नं. २७, सेक्टर -१९, कामोठे, नवी मुंबई
Office Address : त्रिमूर्ती प्याराडाइस, शॉप नं १२, प्लॉट नं.१६, सेक्टर -१६, कामोठे, नवी मुंबई
Phone No. : +91 9870360995
राजकिय कारकीर्द
उपशहर अध्यक्ष, कामोठे शहर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
सन २०१२ – २०१३ उपशहर सचिव, कामोठे शहर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
पक्षाच्या स्थापनेपासून एक सक्रिय कार्यकर्ता
कामोठे ग्रामपंचायत निवडणूक २०१३ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार
इतर पदे
सदस्य - शिवसृष्टी प्रतिष्ठान
सदस्य – कपिलेश्वर मंदिर, गोवंडी
समाजाला कशा प्रकारे मदत करू शकता ?
- शासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणे.
- पायाभूत सुविधांबरोबर नवनिर्माण योजना व सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे.
- कामोठे मधील रहिवाशांना येणाऱ्या समस्येवर, तक्रारींवर निवारण.
- बेरोजगारांसाठी, युवकांसाठी रोजगार मेळावे यांचे आयोजन.
- शहरातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून कामे कार्यरत केली.
पक्षाच्या व संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम
1) नवी मुंबई पोलीस दलातर्फे राबविण्यात आलेल्या गडचिरोली येथील आदीवासी व गरीब लोकांना सहकार्य करण्याच्या उपक्रमास मदतीचा हात म्हणून मनसेतर्फे तेथील आदीवासी व गरीब लोकांना भेट म्हणून जेवणाची नवीन भांडी, घरगुती दैनंदिन वापरातील जुने व नवीन कपडे तसेच खेळणी देण्यात आली.
2) सहकारी मित्रांच्या मदतीने कामोठे शहरात मोफत वाचनालयाचे उद्घाटन व शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन.
3) दरवर्षी गणेशोत्सव विसर्जन दरम्यान गणेश भक्तांना मोफत स्वरूपात पाणी वाटप केंद्राची व्यवस्था करण्यात येते.
शिवसृष्टी प्रतिष्ठान तर्फे स्थानिक नागरिकांना ५००० दिनदर्शिकेचे मोफत वाटप.
4) दरवर्षी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे व मिरवणुकीचे आयोजन.
5) शिवसृष्टी प्रतिष्ठान तर्फे दही हंडी उत्सवाचे आयोजन
6) २६ / ११ मधील शहीदांच्या स्मरणार्थ “ रक्तदान शिबीर ” चे आयोजन
7) कामोठे मधील नागरिकांसाठी सायन – पनवेल द्रुतगती मार्गालगत “ बस थांबा ” ची व्यवस्था करण्यात आली
8) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी चौकामध्ये कार्यक्रमाचे आयोजन.
9) सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठे शहरात वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.
निवेदन व मोर्चे यामध्ये सहभाग
1) कामोठे शहरातील एम. एन. आर. शाळेतील विद्यार्थिनीवर पंखा पडल्याने, विद्यार्थ्यांचा जीव टांगणीस लावत आहे हे लक्षात येताच या संदर्भात म.न.से., म.न.वि.से. व महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत शाळेवर मोर्चा काढून त्यांना जाब विचारण्यात आला.
2) कामोठे शहरातील चौकामधील सी.सी.टी.व्ही. दुरुस्त करण्यासाठी मा. ग्रामसेवक यांना निवेदन देण्यात आले.
खांदेश्वर व मानसरोवर रेल्वे स्थानकात अतिरिक्त तिकीट खिडकी चालू करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली व इतर मुलभूत सुविधांच्या कमतरते संदर्भात वरिष्ठ डी.सी.एम. साहेब यांना लेखी निवेदन देण्यात आले.
3) शेडुंग टोल नाका बंद करण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या वतीने टोल नाक्यावर धडक मोर्चा काढण्यात आला त्यावेळी पोलिसांकडून अटक करण्यात आली.
4) सन्मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार टोल विरोधात कामोठे येथे द्रुतगती मार्गावर रस्ता रोको करण्यात आला त्यावेळी पोलिसांकडून अटक करण्यात आली व जामिनावर सुटका झाली.
5) कामोठे येथे सेक्टर २१ येथे पथदिवे लावण्या संदर्भात सिडकोला निवेदन देण्यात आले व त्यावर लगेचच सिडकोतर्फे पथदिवे लावण्यात आले.
6) कामोठे येथील पोस्ट कार्यालयाकरिता मागणी करण्याचे निवेदन डाक अधिक्षक साहेब यांना देण्यात आले व आजही त्याचा पाठपुरावा चालू आहे.
7) नव्याने चालू झालेल्या खारघर टोल नाक्यांविरोधात घेण्यात आलेल्या घंटानाद आंदोलनात सक्रिय सहभाग.
8) सन्मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महागाई विरोधात आंदोलन छेडण्यात आले व तालुक्याच्यावतीने मा. तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले त्यामध्ये सक्रिय सहभाग.
9) अहमदनगर येथील जावखेड तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा निषेद व्यक्त करण्यासाठी कामोठे येथे झालेल्या सर्व पक्षीय मुक मोर्च्यात सक्रिय सहभाग.
10) खाजगी शालेय वाहनांची चौकशी व अनधिकृत वाहनांवर कारवाई करणेबाबत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
11) कामोठे – मानसरोवर येथे बस व्यवस्था चालू करण्यासाठी सहकाऱ्यांबरोबर सक्रिय पुढाकार.
12) कामोठे शहरातील अपुऱ्या व अनियमित पाणी पुरवठ्या विषयी स्वाक्षरी मोहीम घेवून पाणी पुरवठा विभागाला निवेदन देण्यात आले.
13) दुर्गंधीयुक्त मोकळ्या भूखंडाची स्वच्छता करण्याबाबत सिडको अधिकारी यांना लेखी स्वरूपात निवेदन देवून प्रत्यक्ष उभे राहून भूखंड स्वच्छ करून घेण्यात आले.
14) पोलिसांवर समाज कंटकांकडून होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ सर्व पक्षीय मोर्चा मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत सक्रिय सहभाग.
मनोज कोठारी यांचे छाया चित्र संग्रह...
coming soon
आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...