|  Palghar  | Hitendra Thakur

hitendra-thakur200x200
bahujan-vikas-aghadi

Name : 

श्री हितेंद्र ठाकुर

Constituency :

वसई विधानसभा मतदारसंघ

Party Name :

बहुजन विकास आघाडी

Designation : 

अध्यक्ष – बहुजन विकास आघाडी

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : श्री. हितेंद्र विष्णू ठाकूर

Date of Birth: : ३ ऑक्टोबर १९६१

Place of Birth: : विरार, (महाराष्ट्र)

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : पत्नी श्रीमती प्रविणा

No. of Children : ०३ (क्षितिज, उत्तुंग, शिखर)

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : बीकॉम

Profession : व्यापार व शेती

Residence Address : ठाकूर निवास, राजा शिवाजी मार्ग, विरार (पश्चिम), तालुका वसई, जिल्हा - ठाणे ४०१३०३

Phone No. : 2502542, 2502601

राजकीय इतिहास
- 1985-88 अध्यक्ष, विरार शहर युवक कॉंग्रेस कमिटी.
- 1988-92 अध्यक्ष, वसई तालुका युवक कॉंग्रेस कमिटी.
- 1991-96 नगरसेवक विरार नगरपरिषद.
- 1995 संस्थापक वसई विकास मंडळ.
- 1990-1995, 1995-1999, 1999-2004 सदस्य महाराष्ट्र विधानसभा
- ऑक्टोबर 2004-05 महाराष्ट्र विधानसभेवर फेरणीवड

हितेंद्र ठाकूर यांच्या विषयी थोडक्यात...

हितेंद्र ठाकूर यांनी 1988 मध्ये वसई तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

दोन वर्षांनंतर, 1990 च्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत, ते वयाच्या 29 व्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून वसई-विरारसाठी आमदार म्हणून निवडून आले.

नंतर त्यांनी वसई विकास मंडळ नावाचा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला जो बहुजन विकासमध्ये बदलला. आघाडी आणि त्यानंतरच्या 3 निवडणुकाही जिंकल्या.

त्यांचा राजकीय पक्ष, बहुजन विकास आघाडी (BVA) कडे सध्या वसई विरार महानगरपालिका (VVMC), वसई तालुका पंचायत समिती आणि प्रदेशातील विविध ग्रामपंचायतींमध्ये बहुमत आहे.

अशा प्रकारे त्यांनी वसंत डावखरे यांना महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापतीपद तीन वेळा मिळवून दिले आणि गोविंदा (बॉलिवुड स्टार आणि जवळचा मित्र) यांना २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई उत्तरची जागा जिंकून दिली.

ते आणि त्यांचा मुलगा क्षितिज कार्यालयीन वेळेत भेटण्यासाठी कोणत्याही भेटीशिवाय आणि प्रभावाशिवाय उपलब्ध असतात. त्यांचे लाखो समर्थक त्यांना प्रेमाने लोकनेते म्हणून संबोधतात. वसई-विरार भागात लोक त्यांना अप्पा म्हणायला आवडतात.

शैक्षणिक कार्य
अध्यक्ष, वि.वा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, या संस्थेमार्फत उत्कर्ष विद्यालय(मराठी व इंग्रजी माध्यम), कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ट महाविद्यालय, वि. वा. ठाकूर पदवी महाविद्यालय सुरू केले.
दहावी व बारावी विद्यार्थ्यांसाठी एस.एस.सी. नंतर पुढे काय? या विषयावरील पुस्तके, मार्गदर्शन व तज्ञाच्या व्याख्यनांचे आयोजन.
1990 पासून दरवर्षी 26 ते 31 डिसेंबर या कालावधीत वसई तालुका कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन.
7 वे कोकण मराठी साहित्य संमेलन, नाट्य महोत्सव, प्रत्येक वर्षी संगीत रजनी, कवी संमेलन व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

मुलभुत सुविधा
- वसई विरारसाठी उसगावं पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली.
- तालुक्यातील 4 नगरपरिषदा व 64 गावांसाठी 100 द. ल क्षमतेची पाणीपुरवठा योजना तसेच, राजीवळी, सातीवळी व कामण या पाणीपुरवठा योजना पूर्ण करनायासाठी प्रायणतठरात वसई तालुक्यात 220 के. व्हि. आती उच्च दाबची उपकेंद्रे, 22 के. व्हि. क्षमतेची 5 स्विचिंग स्टेशन्स कार्यान्वित केली.
- सर्व नगरपरिषदाच्या ह्द्दीतील प्राथमिक आरोग्या केंद्रे व शासकीय रुग्णालये नगरपरिषदाच्या ताब्यात घेऊन सुसज्जय करण्यासाठी विशेष प्रयत्न.
- वसई विरार व नायगांव उड्डाण पुलासाठी प्रयत्न.
- अध्यक्ष, यंग स्टार ट्रस्ट, या संस्थेच्या माध्यमातून व्यायमशाळा, आगाशी व सफाले येथे प्रती वर्षी कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन.
- गरजू महिलाना शिलाई माशिनचे वाटप. वि.वा.चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्या तपासणी, नेत्राचिकिटसा, रक्तदान, ज्येष्ठ नागरिकानसाठी ओळखपत्रे, अपंगांसाठी उपकरणांचे वाटप कार्यकामांचे आयोजन, झोपडपट्टी धारकाना स्वंयंपाक गॅसची वाटप.

विविध विधायक कामांची पूर्तता
- विधान सभेवर निवडून येताच श्री. हितेंद्रजी ठाकूर यांनी सर्व प्रथम पाणी प्रश्‍नाला प्राधान्य दिले. शिरगांव, उसगांव इत्यादी लहान पाणी योजना तातडीने कार्यान्वित केल्या. त्यांच्या भगीरथ प्रयत्नांनी सुर्या प्रकल्पाची गंगा तुषार्त वसई तालुक्यात अवतरली. सदर गांगेने तालुक्यात उद्योग व व्यवसाय क्षेत्रात क्रांती केली. त्यामुळे बांधकाम व्यवसाय, वीट उत्पादन व रेती व्यवसाय इत्यादी उद्योगांना प्रचंड चालना मिळाली.
- रस्ते, शाळा, इमारती, क्रीडा मैदाने, स्म्शान भुमी, तलावांचे सुशोभीकरन इत्यादी सार्वजनिक कामांसाठी त्यांनी आपल्या आमदार निधीचा पुरेपूर विनियोग केला. तसेच अन्य खासदार व विधान परिषद सदस्यांचा निधीही तालुक्यासाठी मिळविला. त्यांनी विरार रेल्वे स्टेशनवरून पूर्व-पश्चिम जाणार्‍या उड्डाण पुलसाठी मुंबई महानघर विकास प्राधिकरणाकडून निधी मिळविला असून, सध्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभही झाला आहे.
- भाईंदर व नायगांवचे जुने रेल्वे पूल रस्ता वाहतुकीसाठी मिलवेत, वसई समुद्रातील गॅस ठाणे जिह्यला घरगुती व औद्योगिक वापरासाठी द्यावा व ठाणे जिल्ह्यातील समुद्रा किनारयावर धुप प्रतिबंधक बंधारे बांधावे या क्रांतिकारक महत्त्वाच्या मागण्यांसाठी श्री ठाकूर साहेब गेले दीड शतक सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांना साथ देणे आवश्यक आहे.
- श्री. हितेंद्रजी ठाकूर गेली अनेक वर्षे गरीब विद्यार्थ्याना शालेय साहित्या विनामूल्य देतात. हे मदत कार्य डहाणू तालुक्यपर्यंत पोहोचले आहे. त्यांच्या उत्कर्ष विद्यालय व विवा कॉलेज शेकडो विद्यार्थ्यांची सोय केली आहे. लवकरच इंजिनियरिंग कॉलेज सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

लोकनेते श्री ठाकूर यांचे कार्यालय सर्व सामान्यांसाठी सतत खुले असते. त्यांच्याकडे रोज अनेक लोक आपली कामे घेऊन येतात, ते जनतेच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देतात, त्यामुळे त्यांच्या जनता न्यायालयात लोक मोठ्या अपक्षेने येत असतात. कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक कामे सातत्याने चालू असतात.

Coming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    0 0 votes
    Article Rating
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x