|  Raigad  |  Brijesh Patel

brijesh-patel-200x200
Bjp-logo

Name : 

ब्रिजेश अंबालाल पटेल

Constituency :

वार्ड नं ४, खारघर पनवेल महानगरपालिका

Party Name :

भारतीय जनता पार्टी

Designation : 

अध्यक्ष, खारघर शहर भाजपा

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : ब्रिजेश अंबालाल पटेल

Father's Name : अंबालाल पटेल

Mother’s Name : पार्वती बेन पटेल

Date of Birth : १० जून, १९७६

Place of Birth : मोडासा, ता. अरवल्ली, गुजरात

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : परेशा ब्रिजेश पटेल

No. of Children : -

Languages Known : गुजराती, मराठी, हिंदी, इंग्लिश

Education : इलेक्ट्रिकल इंजिनिअर

Profession : बांधकाम

Hobby : समाजसेवा

Residence Address : खारघर, नवी मुंबई, ता. पनवेल, जि. रायगड

Office Address : मा. आमदार प्रशांत ठाकूर यांचे जनसंपर्क कार्यालय, शॉप नं - ०२, प्लॉट नं - १३८,

Phone No. : +91 9324268633

भारत देशाचे प्रभावी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे प्रेरणास्थान आहे. समाजसेवा हे माझे कर्तव्य समजतो.

राजकीय कारकीर्द
- माझे वडील अंबुभाई पटेल हे राष्ट्रीय सेवक संघाचे कार्यकर्ते आहेत. गुजरातमध्ये भारतीय किसान संघ उभा करण्यात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. वडील आर.एस.एस. मध्ये सक्रीय असल्यामुळे लहानपणापासूनच समाजकार्याचे बालकडू त्यांना वडिलांकडून मिळाले. त्यामुळे ब्रिजेश पटेल देखील RSS मध्ये सक्रीय झाले.

- माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा आरएसएसचे साबरकाठा जिल्ह्याचे जिल्हा प्रचारक होते तेव्हा मला त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. तसेच गुजरातचे माजी कृषीमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली.

- पुढे व्यावसानिमित्त पनवेल तालुक्यातील खारघर शहरामध्ये स्थलांतरित झाले. खारघरमध्ये व्यवसायाबरोबरच समाजकार्यालाही सुरवात केली. आरएसएस मधील सक्रियता आणि निष्ठा पाहून तसेच सामाजिक कार्यामुळे माझ्यावर भारतीय जनता पक्षाने खारघर शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.

- तत्कालीन रायगड जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली खारघर शहरामध्ये भाजपा वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि आता माननीय आमदार तसेच रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा वाढीसाठी प्रयत्न करत आहे.

- भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांना विधान सभा निवडणुकित पनवेल मतदार संघातून विजयी करण्यात खारघरची मोठी भूमिका आहे. खारघर शहर अध्यक्ष म्हणून मी ही जबाबदारी निष्ठेने पूर्ण केली.

  • सामाजिक कार्य
   संपूर्ण खारघरचा विकास हाच माझा ध्यास आहे.
   खारघर शहराच्या विकासासाठी सिड्को प्रशासनाने नियोजन केलेल्या विकास प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा करून खारघर मधील जनतेला परिपूर्ण नागरी सुविधा देण्यासाठी मी महत्वाची भूमिका बजावत आहे.
   खारघर हे नव्याने विकसित होत असलेले शहर आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ठ करून नागरिकांना त्यांचा हक्क्क मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर.
   खारघर मधील प्रत्येक शाळेमध्ये सामान्यतर सामान्य विद्यार्थाला प्रवेश मिळवून देण्यासाठी नेहमी आग्रही भूमिका.
   "भाजपाच्या कार्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहणारा एकमेव शहर अध्यक्ष म्हणून ब्रिजेश पटेल यांची गणना होते. त्यांची पक्षीय निष्ठा पाहून "ब्रिजेश बीजेपी" असे त्यांना संबोधतात."

   खारघरच्या श्री. क्र. क. पाटीदार समाज युवक मंडळाच्या महामंत्री पदाची जबाबदारी गेली अनेक वर्षं सांभाळत आहे.
   खारघर मध्ये प्रत्येक वर्षी गुजराती नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात मोठा सहभाग.

   समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
   खारघर मधील जनतेला परिपूर्ण नागरी सुविधा देण्यासाठी सिडको प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा.
   रस्ते, नाले, गटारे, वीज, पाणी, आरोग्याच्या सुविधा, शिक्षण, अथवा पोलीस सुरक्षेबाबतचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत.

   पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम
   आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी व पालकांसाठी विविध शालेय उपयोगी दाखले वाटप शिबीर घेण्यात आले.
   आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सुंदर खारघरसाठी फुटपाथ फ्री आंदोलन केले.
   वृक्षारोपण, आरोग्य, योगा, शिबिरांसारखे सामाजिक उपक्रम राबवून यशस्वीपणे राबविले.

Coming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

  0 0 votes
  Article Rating
  guest
  0 Comments
  Inline Feedbacks
  View all comments
  0
  Would love your thoughts, please comment.x
  ()
  x