| Bala Nandgaonkar

bala-nandgaokar
1280px-MNS-rajmudra-Flag

Name : 

बाळा दगडू नांदगावकर

Constituency :

१८३, शिवडी विधानसभा मतदार संघ

Party Name :

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Designation : 

मा. आमदार – शिवडी विधानसभा मतदार संघ (म.न.से)

कार्य अहवाल / जाहीरनामा


Name
: बाळा दगडू नांदगावकर

Father's Name : दगडू लखमा नांदगावकर

Mother’s Name : श्रीमती पार्वतीबाई दगडू नांदगावकर

Date of Birth : २१ जून १९५७

Place of Birth : जे.जे. हॉस्पिटल, मुंबई

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : पत्नी श्रीमती लीना बाळा नांदगावकर

No. of Children : ०१ कन्या

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Religion : हिंदु

Education : दहावी

Profession : धंदा

Hobby : क्रिकेट व समाजकार्य

Residence Address : ५/३६ बी, आय टी चाळ, सेंट मेरी मार्ग, माझगाव, ताडवाडी, मुंबई - ४०००१०

Office Address :

 • शिवडी विधानसभा लालबाग गड
  हरहरवाला इमारत, तळमजला, बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबाग, मुंबई - ४०००१२

  राजगड

  मातोश्री टॉवर, दुसरा मजला, माटुंगा, मुंबई, दुरध्वनी क्र.: +९१ २२ २४३३३५९९

  काळाचौकी गड
  श्रावण यशवंते चौक, काळाचौकी पोलीस स्टेशन जवळ, काळाचौकी, मुंबई - ३३

दुरध्वनी क्र.: +९१ २२ २४७१९९४०

राजकीय कारकीर्द
१९९२ - १९९७ - नगरसेवक
१९९५ - १९९९ - सदस्य महाराष्ट्र विधानसभा ((उत्कृष्ट संसदपटू))
१९९९ - गृह खाते (ग्रामीण)
१९९९ - २००३ - सदस्य महाराष्ट्र विधानसभा
२००३ - २००९ - सदस्य महाराष्ट्र विधानसभा
२००९ नंतर - सदस्य महाराष्ट्र विधानसभा
१९९७ - २००१ - अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशन

थोडे बाळा नांदगावकर बद्दल.........

२५ वर्षांच्या राजकिय कारकिर्दित अनेकदा उलथापालथ झाली अनेक आनंदाचे, खाचखळग्यांचे, ताणतणावाचे क्षण मी अनुभवले आहेत. त्या भूतकाळातील आठवणी तसेच भविष्यातील माझ्या मनातील संकल्पनांचा आढावा तुमच्यासमोर असणार आहे.

माझगांव विधानसभेतील मी लढवलेल्या ३ निवडणूका त्यावेळी उडालेला राजकिय धुरळा, बाळा नांदगांवकर या नावामागे लागलेली जायंटकिलर हि उपाधी (इथे कुणालाही दुखावण्याचा हेतु नाही) माझगांव मधील प्रत्येक व्यक्तीशी असणारा माझा जिव्हाळा, माझगांव मधील सामाजिक कार्ये, थोरामोठ़यांशी असणारा ऋणानुबंध, मनाचा कोंडमारा, राजकिय परिवर्तन, त्यातुनच नव्याने पुन्हा राजकिय पटलावर उभा राहिलेला बाळा नांदगांवकर. सामाजिक सेवा त्यातुनच मिळालेला मानसन्मान, त्यानंतर घडणारा नवनिर्माणाचा नवा प्रवास या संकेतस्थळाच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत साकारणार आहे.

माझगांवातल्या ताडवाडीतले माझे बालपण. त्या ताडवाडीत मी लहानाचा मोठा झालो, खेळलो बागडलो, अगदी भांडलोदेखील. रक्ताच्या नात्यासारखी जिवाभावाची भावनिक नाते जपणारी , प्रेम देणारी माणसे इथे भेटली. सामाजिक कार्याचा श्री गणेशा ताडवाडीच्या भूमीतूनच झाला. तिथल्या स्थानिकांच्या नागरी समस्यांची मला लहानपणापसूनच जाण होती. सामाजिक सेवेचे बाळकडू माझ्यामध्ये उपजतच होते आणि सामाजिक सेवेचे संस्कार मोठ्या साहेबांकडून (आदरणीय श्री. बाळासाहेब ठाकरे) मिळाले होते. प्रथमतः मी नगरसेवक झालो ते साहेबांच्या आशिर्वादाने, त्यानंतर माझ्या सामाजिक कार्याची जाण ठेवून मला आमदारकीचा बहुमान मिळाला. १९९५ ची निवडणूक म्हणजे माझ्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा. माझगांवातल्या प्रस्थापित राजकिय नेत्याविरुध्द (तत्कालीन बांधकाम मंञी श्री. छगन भुजबळ साहेब) मला साहेबांनी निवडणूक रिंगणात उतरवले. माझगांवकरांच्या आशिर्वादाने, तळागळातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे, पदाधिकारयां मुळे मी निवडणूक जिंकलो नव्हे तर माझगांवकरच निवडणूक जिंकले. संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या ह्या निवडणुकीमुळे माझ्या अवती भवती प्रसिध्दीचे वलय निर्माण झाले. माझगांव गड शाबूत ठेवणे सर्वस्वी जवाबदारी मी निस्वार्थीपणे, निरपेक्षवृत्तीने मनापासून जपली म्हणूनच सतत ३ वेळा माझगांवकरांनी मला आमदारकीचे प्रतिनिधित्व दिले. युती शासनाच्या काळात गृहराज्यमंञी पदाची जबाबदारी मिळाली. या प्रवासातच माझ्या कार्याची दखल घेत राज्य सरकारने मला उत्कृष्ट संसदपटू चा पुरस्कार बहाल केला.

माझे राजकिय परिवर्तन परिवर्तन हा संसाराचा नियम आहे असाच परिवर्तनात्मक नियम नियतीने माझ्या हि आयुष्यात घडवला. माझगांव विधानसभेतील माझी तिसरी निवडणूक मी पराभूत व्हावी अशी इच्छा दुर्दैवाने पक्षातीलच काही मंडळींची होती. त्यासाठी अनेक नितिंचा त्यांनी वापर केला. पैशाने गब्बर असलेल्या महाभागाला माझ्या विरोधात उभे करुन पाठीत वार करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला, पण माझ्यामागे समस्त जनता, जागृत देव-देवतांचा आशिर्वाद होता, तळागळातील प्रत्येक कार्यकर्त्यांची, पदाधिका-यांची निस्वार्थी मेहनत होती. त्या निवडणूकीत प्रस्थापित राजकिय नेत्याच्या (श्री. छगन भुजबळ यांचे पुञ) युवराजांचा (पंकज भुजबळ) पराभव करण्यात आम्ही सर्व यशस्वी ठरलो. २००४ चा तो काळ म्हणजे महाराष्ट्राची सत्ता खेचुन आणण्याची सुवर्णसंधीच होती. सरकार दरबारी सत्ता उपभोगणारा पक्ष पूर्णपणे अपयशी ठरला होता. परंतू आप्तस्वकियांची खेकडावृत्तीच (पाय खेचण्याची) शिवसेना पक्षाला हानीकारक ठरली. जो प्रकार माझगांव विधानसभेत करण्याचा प्रयत्न झाला तोच प्रकार महाराष्ट्रातील बहुतांश मतदार संघात घडला. परिणामी मिळणारी सत्ता हातची निसटुन गेली. माझ्या तक्रारीचा सुर मी पक्षश्रेष्ठींकडे कळवला परंतू त्यातून काहिही निष्पन झाले नाही.

मराठीच्या न्यायहक्कासाठी धडाडणा-या तोफा काहिशा थंड पडल्या होत्या. समज-गैरसमजाच्या राजकारणाने एक वेगळाच नूर पालटला होता. दस्तरखुद्द पक्षातीलच एक जेष्ठ तरुण उमदे व्यक्तीमत्व श्री. राज ठाकरे मनाचा कोंडमारा करून दिवस ढकलत होते आणि अचानक एक दिवस उद्रेक झाला. संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा कौल घेवून ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष राजकिय पटलावर विराजित झाला. मनाच्या कोंडमा-यातून एक नवं परिवर्तन माझ्याही आयुष्यात घडून आले. त्यावेळी मा. राजसाहेबांबरोबर तत्कालीन आमदार म्हणून फिरणारा मी एकटाच होतो. नवनिर्माणाच्या विचारांची कास धरून, समस्त महाराष्ट्रातील तमाम मराठी तरूणांना, अबाल वृध्दांना, महिलांना एकञ घेवून एक नवा इतिहास घडवण्याचे व्रत आम्ही मनापासून घेतले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चौरंगी ध्वजाखाली एक नवी इनिंग खेळण्यासाठी आम्ही सज्ज झालो.

परदेश दौरे

 • युरोपचा शैक्षणिक दौरा महाराष्ट्र शासना तर्फे दुबई, व्हिएत्नाम, चीन...

सामाजिक कार्य - शैक्षणिक उपक्रम

एस.एस.सी. परीक्षा, तज्ञ-मान्यवर प्राध्यापकांच्या मार्फत मार्गदर्शन शिबीर

शिवडी-भायखळा विभगाच्या वतीने आमदार गटनेते श्री.बाळा नांदगांवकर यांच्या संकल्पनेतुन, दहावी च्या विद्यार्थी व पालक वर्गासाठी एका विशेष मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या बोर्डाच्या परीक्षेस कसे सामोरे जायचे? ताणतणाव कसा दूर करायचा? परीक्षे अगोदर तसेच परीक्षे नंतर पालकांनी विद्यार्थ्यांशी कसे वागावे? दिनक्रम कशा पध्दतीचा असावा? या बद्दल मौलिक मार्गदर्शन श्री. करंदिकर सर यांनी केले. परेलच्या नरेपार्क मैदानावर २५०० विद्यार्थी व पालकवर्गाने अलोट गर्दी केली होती. विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भिती, पालकांचे दडपण, त्यांच्या अपेक्षा, आरोग्यविषयक मार्गदर्शन, मानसशास्र अशा अभ्यासाव्यतिरिक्त विविध विषयांवर पालकांना तसेच विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवणारे अनूभवी विचार या मार्गदर्शन शिबिरातून मिळाले. मुंबईतील मान्यवर प्राचार्य, शिक्षक सौ. सोनम पराडकर, श्री. सोनावणे, श्री. अनिल शिंदे, श्रीमती डॅा. चंद्रिका देढिया आदी मान्यवरांनी आपले मार्गदर्शन पर विचार व अनुभव कथन केले. पालकांच्या तसेच मनातील अनेक शंकाचे व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देखिल या शिबिरातून त्यांना मिळाली.

मार्गदर्शन शिबिराच्या अखेरच्या सञात उत्तरपञिकेवरील माहिती व बा. हॅालोक्राफ्ट स्टिकरा या विषयी विशेष मार्गदर्शन सेवा संघाचे अध्यक्ष श्री. सुरेश शिवलकर यांनी केले. सदर मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांना नमूना उत्तरपञिका तसेच सराव प्रश्नसंचाचे वाटप करण्यात आले. पालकवर्गाला देखील मार्गदर्शन पञके वाटण्यात आली.

मुंबईत प्रथमतःच पक्ष पातळीवरून एवढ्या भव्य प्रमाणात अशा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिण मुंबईतील माझ्या मध्यमवर्गीय विभागातले हुशार विद्यार्थी बोर्डात घवघवीत यश प्राप्त करून मोठे व्हावेत, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या भावनेतून हा मार्गदर्शन शिबिराचा छोटासा प्रयत्न केला आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे यशस्वी हि झाला.

क्रिडाविषयक उपक्रम
ज्येष्ठ नागरिकांसाठी चालण्याची मारेथोन स्पर्धा
प्रती वानखेडेसारखी सुविधा उपलब्ध करून तरुण क्रिकेट प्रेमींसाठी स्पर्धा आयोजित केली

विशेष उपक्रम - रोजगार मेळावा
शिवडी विधानसभा आणि रोजगार स्वयंरोजगार विभागाच्या वतीने विधिमंडळ गटनेते व आमदार श्री. बाळा नांदगांवकर यांच्या संकल्पनेतून झेप नवनिर्माणाकडे या अभियाना अंतर्गत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. परळच्या ऐतहासिक अश्या कामगार मैदानावर हा मेळावा युवक-युवतींच्या तुडुंब गर्दीने गजबजला होता. राज्य सरकारच्या उदासीनतेचे आणि मुंबईतल्या तमाम बेरोजगारीचे ते दाहक आणि वास्तववादी असे दृश्य होते. नुकत्याच आलेल्या वरुण राजाच्या वर्षावाची तमा न बाळगता सुशिक्षित तरुण-तरुणींची गर्दी तासागणिक वाढत होती. मुंबईतल्या नामांकित आणि मानांकित अशा आस्थापनांच्या व्यवस्थापकांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने हिंदुस्तान युनिलीवर, एम न एम, फोर्टीस हॉस्पिटल, लूप मोबाईल तसेच बँकिंग क्षेत्रातले एच.डी.एफ. सी., आयसीआयसीय, मुंबई महानगर बँक तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील आस्थापनांचे व्यवस्थापक आलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या मुलाखती घेऊन आपापल्या कंपनीज मध्ये रिक्त जागांची पूर्तता करून घेत होते.

विशेष उपक्रम - जेष्ठ नागरीक भवन
शिवडी व जुन्या माझगांव विधानसभेतील अभ्युदयनगर हा माझ्या मतदार संघातील एक महत्वाचा टापू. ४०/५० इमारती, सलगच असलेली जिजामाता नगर वसाहत (आंबेवाडी)असा मराठमोळ्या लोकांचा जणू एक छोटा गावच. इथे शहिद भगतसिंग मैदान अगदी खुप विस्तिर्ण आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची, ललित कला भवनाची वास्तू, समाज मंदिर हॉल अशा वास्तू या ठिकाणी आहेत. इथे नव्हते ते जेष्ठ नागरीकांचे आश्रयस्थान. अभ्युदयनगरामधील जेष्ठ नागरीकांसाठी एक हक्काचे स्थान हवे होते. सुख-दुःखांच्या, गतकाळाच्या आठवणिंचा संवाद साधणारे एक हक्काचे घर हवे होते. वार्षिक उत्सव, सण, मेळे सर्व वयोवृध्दांची इच्छा मला त्यांच्या डोळ्यात जाणवली आणि अंतकरणाने कळली.तेव्हा अभ्युदयनगरामधील शहिद भगतसिंग मैदानासमोरील एका भुखंडावर आमदार म्हणून सामजिक कार्यातील महत्वाचे योगदान म्हणजेच दिमाखात उभे राहिलेले "जेष्ट नागरीक भवन" आजमितिस त्या ठिकाणी जेष्ठनागरीकांच्या सभा, त्यांचे कार्यक्रम, उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरे होताना पहातोय तेव्हा त्यांच्या चेह-यावरचे समाधान मला खुप काहि देवुन जाते.

विशेष उपक्रम - रे रोड स्मशानभूमी
मृत्यू हा अटळ आहे. हे शाश्वत सत्य माणूस म्हणून आपण नाकारूच शकत नाही. प्रत्येकाला एक ना एक दिवस या इथून इहलोकीचा प्रवास करायचा आहे. हि घटना मनाला दुःखदायक असली तरी त्या संकटास प्रत्येकास सामोरे जावेच लागणार आहे. अशाच इहलोकीच्या अंतिम प्रवासाचे स्थानक म्हणजे माझगांव विधानसभेतील रे रोड स्मशानभूमी. दुःखी अंतकरणाने आलेल्या आपल्या जिवाभावाच्या माणसाला अखेरचा निरोप देण्याचे ठिकाण हि स्मशानभूमी. सर्व सोयींनी उपयुक्त असावी अशी माझी इच्छा होती. त्या दृष्टीने संपुर्ण रे रोड स्मशानभूमी सुशोभित करण्याचे ठरविण्यात आले, इतकेच नव्हे तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या स्मशानभूमीत अद्दावत विद्युत दाहिनी देखील बसवण्याचे ठरवण्यात आले. दुःखी कष्टी असलेल्या आप्तस्वकिय नातलग मंडळींना बसण्यासाठी एक स्वतंञ आसन व्यवस्थेची देखील तरतूद या ठिकाणी करण्याचे ठरविले. संपुर्ण आराखडा तयार करून संपुर्ण रे रोड स्मशानभूमी नव्याने तयार करुन, सुंदर बागायत करून सुशोभित करुन, मुंबईचे महापालिका आयुक्त श्री. जयराज फाटक यांच्याहस्ते रे रोड स्मशानभूमी दि. | | २०१० या दिवशी लोकर्पण करण्यात आली | |

इतर...
स्वस्त दरात कांदे वाटप करून महागाई विरोधात अनोखे अभियान
९ रु. दराने साखर वाटप
महिलांना वाहन प्रशिक्षण देऊन त्यांना परवाना वाटप करून रोजगार उपलब्ध करून दिला
शेतकऱ्यानकडून आणलेला भाजीपाला, अन्नधान्य स्वस्त दरात घरोघरी विक्री केली.
परप्रांतीयांची मक्तेदारी संपवणारी मराठी तरुणांची रेल्वे भरती अभ्यास मोहीम
ज्येष्ठ नागरिक ग्रंथालय - पुस्तकांचे रैक बनविले

जनहितासाठी
सरकार विरोधात अटकेची तमा न बाळगता जन आंदोलन
जोसेफ बाप्तीस्ता उद्यान व मतदार संघातील समस्या थेट मुंबईचे पालक मंत्री ना. जयंत पाटील यांना दाखवल्या.
वेळोवेळी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतात आणि तत्परतेने त्या मार्गी लावतात.
परळ मधील वाडिया हॉस्पिटल संदर्भात आरोग्य मंत्र्यांशी थेट चर्चा

सांस्कृतिक उपक्रम
शिवडी-भायखळा विभागात नृत्य स्पर्धा
शिवडी-भायखळा विभागात चित्रकला स्पर्धा
दही हंडी उत्सव
शिवडी-भायखळा विभागातील लहान मुलांसाठी विविध खेळांचे आयोजन करून मनसे बाल जल्लोष

  •  

Comming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

  3.7 3 votes
  Article Rating
  guest
  0 Comments
  Inline Feedbacks
  View all comments
  0
  Would love your thoughts, please comment.x
  ()
  x