|  Omprakash Babarao Kadu 

bacchu-kadu-200x200
prahar-200x200

Name : 

श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू

Constituency :

४२, अचलपूर विधानसभा मतदार संघ

Party Name :

प्रहार जनशक्ती पक्ष

Designation : 

आमदार – ४२, अचलपूर विधानसभा मतदार संघ

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू

Father's Name : बाबराव गणपतराव कडू

Mother’s Name : श्रीमती इंदिराबाई बाबाराव कडू

Date of Birth : ५ जुलै, १९७०

Place of Birth : बेलोरा, ता. चांदूर, जि. अमरावती, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. नैनाताई ओमप्रकाश कडू

No. of Children : 01

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : बी. कॉम., बी. पी. ई

Profession : शेती

Hobby : कबड्डी खेळणे, पोहणे

Residence Address : रा. बेलोरा, ता. चांदूर बाजार, जि. अमरावती

Office Address : ६६/८, नवीन मनोरा आमदार निवास, फ्री प्रेस जनरल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई - 400021

Phone No. : +91 9890153491 / निवास : 07223 - 252233

राज्यमंत्री
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार

राजकीय कारकीर्द
प्रहार संघटना स्थापना – सन १९९९
पहिली विधानसभा - सन १९९९ (१२०० मतांनी पराभव)
पहिली लोकसभा - सन २००४
दुसरी विधानसभा - सन २००९ (१३००० मतांनी विजयी) आमदार
प्रहार पक्ष स्थापना – सन २००४
तिसरी विधानसभा - सन २००९ (१०,१७० मतांनी विजयी) आमदार

निवडणुकीची घोडदौड
पहिली महाविद्यालयाची निवडणूक १९८९ – पराभूत
अपक्ष – जि.प. निवडणूक (शिरजगाव बंड सर्कल) १९९२ – पराभूत
अपक्ष – ग्रा. प. बेलोरा निवडणूक २.३.१९९७ – विजयी
शिवसेना – पंचायत समिती बेलोरा सर्कल निवडणूक – विजयी
अपक्ष - पहिली विधानसभा निवडणूक १९९७ – पराभूत
अपक्ष - पहिली लोकसभा निवडणूक २००४ – फक्त ६००० मतांनी पराभूत
अपक्ष - दुसरी विधानसभा निवडणूक २००४ – विजयी
अपक्ष – तिसरी विधानसभा निवडणूक २००९ – विजयी

किमान ७ वेळा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. निवडणूक तर गाजलीच त्या सोबतच घेतलेले चिन्ह सुद्धा वारंवार वेगळे होते परंतु एकदा जे चिन्ह घेतल त्या चिन्हाची उमेदवाराकडून मागणी वाढली.

जि. प. निवडणुकीत चिन्ह – मशाल
ग्रा. प. निवडणुकीत चिन्ह – छत्री
पंचायत समिती निवडणूकीत चिन्ह – धनुष्यबाण
पहिली विधानसभा चिन्ह – विमान
लोकसभा चिन्ह – पतंग
दुसरी विधानसभा चिन्ह – कपबशी

आजवर केलेली आंदोलने

१) प्रति मंत्रीमंडळ
प्रहारचे दि. १७.०९.२००७ ला आयुक्तालय, अमरावती येथे शेतकरी शेतमजुरासाठी लक्षवेधी प्रति मंत्रीमंडळ

मागण्या
1. कापूस उत्पादकांना मदत, लाल्याची रक्कम तातडीने देण्यात यावी.
2. ग्रामीण भागात गावठाण फीडर उभारणे.
3. ग्रामीण व शहरी भागातील अतिक्रमणे नियमित करण्यात यावी.
4. अतिवृष्टीतील खचलेल्या विहिरींना जलपूर्ती योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावे.
5. शहरी घरकुल योजने प्रमाणे ग्रामीण भागामध्ये देखील घरकुल योजना राबविणे.

फलश्रुती
1. मा. आयुक्त यांचे दि. १८.०९.२००७ चे पत्रानुसार सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन.
2. तसेच फलोत्पादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, मुंबई यांचे घरकुल संदर्भात खुलाश्याचे दि. २७.०४.२००९ पत्र.
3. चांदूर बाजार तालुक्यातील कापूस उत्पादकांना अनुदान राशीचे वितरण, आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते १ कोटी ७५ लाख ४० हजार पहिला टप्प्याचे वाटप.

२) उलटे लटकावून आंदोलन दि. २५.०२ २००४
अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना होणारा त्रास आर्थिक, मानसिक व शारीरिक हानी थांबावी या करिता आंदोलन
मागण्या
1. रुग्णांना होणारी आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.
2. रुग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी

फलश्रुती
आरोग्य अधिकाऱ्याकडून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले.

३) ठिय्या आंदोलन दि. २.०८.२००७
अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले होते. पण त्याची नुकसान भरपाई शासनाने न दिल्यामुळे प्रहार संघटनेला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला.

मागण्या
1. शेत खरडून निघलेल्या शेतीचे तातडीने सर्वेक्षण करून मदत देण्यात यावी.
2. पडझडीतील (घरे) नुकसान ग्रस्तांना मदत मिळावी.
3. तात्पुरत्या निवाऱ्यासाठी घरे, बांधणी करिता आर्थिक मदत करावी.
4. पुरामुळे खचलेल्या विहिरींचे दुरूस्ती करिता मदत घ्यावी.

फलश्रुती
प्रहारच्या प्रयत्नाने १९ जानेवारी २००७ ला शेतकरी नुकसान भरपाई धनादेश वाटप केले गेले. यामध्ये २ लाख ७६ हजार रु. २७ शेतकर्यांना देण्यात आले.

४) अर्धदफन आंदोलन
शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात आमदार बच्चू कडू व संजय देशमुख यांनी कार्यकर्त्यांसमवेत अर्ध दफन आंदोलन केले. (दि. २० सप्टेंबर २००७ रोजी तिवसा तालुक्यात प्रचंड गारपीट होऊन १९.१५ हेक्टर शेतीपिके नष्ट झाली)

मागण्या
1. आपत्ती ग्रस्त भागात शेतकर्यांना तातडीने अनुदान उपलब्ध करुन देण्यात यावे.
2. अतिवृष्टीत खचलेल्या विहिरींचे जलपूर्ती योजनेमध्ये समावेश करण्यात यावा.
3. दारिद्र्य रेषेचे सर्वेक्षण करण्यात यावे.
4. तिवसा तालुक्यात ग्रामीण रुग्णालयाची दुरूस्ती, विजेची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात यावी.
5. प्रलंबित ट्रामा केअर युनिट सुरु करण्यात यावे.

फलश्रुती
1. शेतकर्यांना तातडीने अनुदान प्राप्त झाले.
2. दारिद्र्य रेषेचे सर्वेक्षण करण्यात आले.
3. ग्रामीण रुग्णालयाची दुरूस्त करण्यात आले.

५) दारूच्या दुकानासमोर दुध वाटप आंदोलन
२० जानेवारी २००७ पासून दारू दुकानासमोर दुध वाटप या अभिनव आंदोलनाची सुरवात करण्यात आली. यामध्ये मोर्शी, चांदूर बाजार, नांदगाव, वरुड व इतर ठिकाणी प्रहार संघटनेने हे आंदोलन राबविले. या आंदोलनात विशेषतः महिला सक्रीय सहभागी होत्या.

उद्दिष्टे
1. संपूर्ण दारूबंदी.
2. मद्य विक्रीचे परवाने देताना महीला आमसभेची परवानगी घेण्यात यावी.
3. दारूच्या पुरवठ्याला पायाबंदी.
4. मद्यपी व स्त्रियांच्या छेड काढण्याविरुद्द कडक कारवाई.

६) खुर्ची जालावो आंदोलन
पेरणीची वेळ येवून ठेवल्यावर सुद्धा शेतकर्यांना बियाणे व खत तालुका पातळीवर उपलब्ध करुन न दिल्यामुळे शेतकर्यावर होणार्या अन्यायाच्या निषेधार्थ खुर्ची जलावो आंदोलन करण्यात आले. (तालुक्यातील कृषी अधिकारी यांना निवेदन)

फलश्रुती
तालुका कृषी अधिकारी यांनी बियाणे व खते उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.

७) अधिकारी खुर्ची लिलाव आंदोलन (दि. १४ मे २००९)
शासकीय अधिकार्यांना कामाचे नियोजित दिवस असताना सर्वसामान्य जनतेला अधिकारी मात्र कामावर गैरहजर असल्याकारणाने सतत त्रास सहन करावा लागतो. सर्वसामान्य जनतेचे शासकीय कामे वेळेवर व्हावी याकरिता गैरहजर अधिकाऱ्यांच्या खुर्च्या जप्त करण्याचे आंदोलन केले.

फलश्रुती
गटविकास अधिकारी पंचायत समिती चांदूर बाजार यांनी पंचायत समिती चांदूर बाजारमधील कर्मचारी व अधिकारी यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.

८) शासनाच्या निषेधार्थ शेतकर्यांचे सामुहिक मुंडन आंदोलन
कापसाचा चुकारा न मिळण्यामुळे जिल्यातील कर्जबाजारी शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्येच्या व शासनाच्या जाचक धोरणाविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार युवा शक्ती संघटनेच्या नेतृत्वात मोर्चा काढून शेतकर्यांनी मुंडन आंदोलन केले.

फलश्रुती
1. कापसाचा चुकारा.
2. कर्जामध्ये सूट देण्यात आली.
3. विद्युत बिलामध्ये कपात.
4. ना. तटकरे यांचे केरोसीन घोटाळ्याचे चौकशी आदेश.

९) विहिरीत उतरून आंदोलन
महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीने शेतकर्यांसाठी स्वाभिमानी योजना सुरु केली होती, हि योजना स्वाभिमानाची नसून शेतकर्यांचा अपमान करणारी होती हलाखीच्या परिस्थितीमध्ये प्रती अश्वशक्ती २५००/रुपये दंड शेतकऱ्यांवर ठोठावला होता. म्हणून हि योजना शेतकर्यांवर अन्याय करणारी होती हा दंड माफ करावा याकरता प्रहारने विहिरीत उतरून आंदोलन केले. त्याचप्रमाणे विज वितरण कंपनीची स्वाभिमानी योजना बंद करण्यात यावी. पावसाळ्यात बारा तास वीज पुरवठा बंद असताना वीज पंपाचा वापर नसताना शेतकर्यांना पूर्ण वर्षाचे बिल देण्यात येवू नये. शेतकर्यांना केवळ १०० रु. प्रती माह प्रमाणे बिल आकारण्यात यावे.

फलश्रुती
आंदोलनाची दखल घेवून पोलीस उपविभागीय अधिकारी व वीज कंपनीचे नांदुरकर विहिरीत खाली उतरून चर्चा केली. राज्याच्या उर्जा मंत्र्यांशी बच्चू कडू यांनी दुरध्वनीवरून संपर्क साधला. उर्जा मंत्र्यांशी ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

१०) शोले आंदोलन
दि. १४ डिसेंबर २००६ रोजी गुरुवार स्थळ – नागपूर व विदर्भातील एकूण १०० गावात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.

मागण्या
1. शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी.
2. कापूस उत्पादक शेतकर्यांना हेक्टरी मदत ५००० रु. मिळण्याकरिता.
3. शेतकर्यांना २००४ मधील दुबार पेरणी, गारपिटग्रस्त, पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळणे हेतू.
4. शासकीय कार्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत.
5. भूमिहीन, अपंग, विधवा, महिलांना २ रु. किलोने धान्याची मदत मिळणे बाबत.
6. शेतकर्यांच्या सोयीचे वीज भारनियमन करण्याबाबत.
7. विदर्भातील अपूर्ण प्रस्थावित सिंचन प्रकल्प तातडीने प्रशासकीय मंजुरातीसह निधी उपलब्ध करण्याबाबत.
8. डाळ प्रक्रिया उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये समाविष्ट करण्याबाबत.

११) अकरा दिवस अन्नत्याग आंदोलन
दिनांक २२ सप्टेंबर २००८ रोजी सोमवार स्थळ श्री क्षेत्र नागराखाडी आश्रम

मागण्या
1. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुरुस्थान कार्यक्रम व एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम.
2. अचलपूर शहर हे ऐतिहासिक शहर असून विदर्भाची राहिलेले शहर आहे, म्हणून अचलपूर जिल्हा निर्मिती करावी.
3. शकुंतला एक्सप्रेस म्हणजे विदर्भाची शान आहे म्हणून यवतमाळ, मुर्तीजापूर, आणि अचलपूर ते चांदूर बाजार – नरखेड रेल्वे मार्गाला जोडण्यात यावी.
4. अमरावती जिल्हा हा महामहीम राष्ट्रपतीचा जिल्हा आहे, जसे लातूर जिल्ह्यात मुख्यमंत्रीचा जिल्हा म्हणून भारनियमन केले जात नाही त्याप्रमाणे पवन उर्जा प्रकल्प राबवून अमरावती जिल्हा भारनियम मुक्त करण्यात यावा.
5. चांदूर बाजार व अचलपूर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्यात यावे.
6. भारतीय वेळेनुसार करण्याबाबत.
7. रोजगार हमी योजनेतील कामांना मंजुरी देण्यात यावी.
8. विदर्भातील शासकीय कार्यालयातील रिक्त पद तातडीने भरण्यात यावी.
9. अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरीच्या मोबदला मिळण्यात यावा.
10. दुबार – तिबार पेरणी झालेल्या शेतकर्यांना विशेष सहाय्यता म्हणून १०,००० तूर, कापूस, सोयाबीन तसेच संत्रा फळ पिकाला हेक्टरी २५०००/- रु. मदत करावी.
11. चांदूर बाजार व अचलपूर येथे झालेल्या अतिवृष्टीतील पूरग्रस्तांना पूरनियंत्रण रेषेचे आतील.
12. तसेच पूरनियंत्रण रेषेचे आतील ज्याची घरे पूर्णतः पडलेली आहेत. दारिद्र्य रेषेखालील व जे दारिद्र्य रेषेखाली नाही अशा कुटुंबियांना सुद्धा शासन नियमाप्रमाणे १५००/- रुपयाची आर्थिक मदत देण्यात यावी.
13. २ जून २००७ गारपीटग्रस्त झालेल्या शेतीपिकाचे नुकसान रतनपूर, सायखेड, कारंजा, बहिरम, बोदड, मंजूर करण्यात यावी.
14. शेतकरी पकेज अंतर्गत पात्र शेतकर्यांना अद्यापपावेतो पूर्ण वाटप न झाल्याने तातडीने करण्याबाबत.
15. असंघटित क्षेत्रात काम करणार्यांना आरोग्य विम्याची अंमलबजावणी.
16. अचलपूर मतदार संघातील लोकांचे दारिद्र्य रेषेची अपील केली. त्यामध्ये सुटलेल्या अपिलार्थींची व्हिडीओ चित्र फितीसह करुन तातडीने करण्यात यावा.
17. २० वर्षांपासून जे कुटुंब अतिक्रमण मध्ये वास्तव्य करून राहत आहे त्यांना तातडीने ती जागा नियमाकुल करून नावे करण्यात यावी.
18. अचलपूर येथील पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या जागेवर केळी प्रक्रिया उद्योग उभारण्यात यावे.

फलश्रुती
पत्र क्र.आय.डी.डी./डब्लू एफ जी – ००५ / ७ अ प्रकल्प पवन उर्जा विकसित करण्याबाबत ०८ – ०९ / ०५ / ९३ दि. २३.०९.२००८ अवर सचिव संकीर्ण २००८ / प्र. क्र. १५८ नवि ५६ नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई दि. १२.११.०८

Comming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    5 1 vote
    Article Rating
    guest
    1 Comment
    Oldest
    Newest Most Voted
    Inline Feedbacks
    View all comments
    Raju Gore

    भाऊंची राजकीय आणि सामाजिक यशस्वी घोडदौड कौतुकास्पद आहे… खूपच Impressive प्रोफाईल आहे.

    1
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x