|  Raigad  |  Aabhimanyu Patil

abhimanyu-patil-200x200
Bjp-logo

Name : 

श्री. अभिमन्यू धर्मा पाटील

Constituency :

प्रभाग क्र. ४, खारघर, पनवेल महानगरपालिका

Party Name :

भारतीय जनता पार्टी

Designation : 

मा. प्रभाग समिती (अ) सभापती | नगरसेवक प्रभाग क्र.४, पनवेल महानगरपालिका

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : श्री. अभिमन्यू धर्मा पाटील

Father's Name : धर्मा सुदाम पाटील

Mother’s Name : मनुबाई धर्मा पाटील

Date of Birth : १ जून, १९६३

Place of Birth : मुर्बी गाव, ता. पनवेल, जि. रायगड, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. वनिता अभिमन्यू पाटील

No. of Children : ०३

Education : नववी

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Profession : सिव्हील वर्क

Hobby : सामाजिक कार्य, वाचन, प्रवास

Residence Address : मु. मुर्बी, पो. खारघर, घर क्र.८६३, ता. पनवेल जि. रायगड

Office Address : साई श्रद्धा, शॉप नं. ६, प्लॉट नं. १२७, सेक्टर १३, खारघर, ता. पनवेल जि. रायगड

Phone No. : +91 9819706059

राजकीय कारकीर्द
मा. स्थायी प्रभाग समिती (अ) सभापती, पनवेल महानगरपालिका
मा. नगरसेवक, पनवेल महानगरपालिका  (प्रभाग क्र. ४ खारघर)
मा. खजिनदार रायगड जिल्हा, भारतीय जनता पार्टी
मा. चिटणीस रायगड जिल्हा, कॉंग्रेस पार्टी
मा. तालुका अध्यक्ष पनवेल, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी

इतर पदे
अध्यक्ष, सिद्धिविनायक शैक्षणिक सामाजिक संस्था 

    • सामाजिक कार्य
      मा. खासदार लोकनेते श्री.रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री रामशेठ ठाकुर सामाजिक विकास मंडळ च्या वतीने प्रभागातील मुर्बी गावातील गोरगरीब व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
      ---------------------------
      खारघर येथील सेक्टर-१९ मुर्बी गावातील युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी क्रिकेट सामन्यांचे आयोजन...
      ---------------------------
      खारघर येथे खाडीलगत असलेल्या पोंडच्या आजूबाजूला झाडे लावून आमदार श्री प्रशांत ठाकूर साहेबांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.
      ---------------------------
      अयोध्येतील भव्य राममंदिर निर्माण समर्पण निधी म्हणून खारघर येथे विशेष व्यक्ती संम्मेलयांत पनवेलचे कार्यसम्राट आमदार श्री प्रशांतदादा ठाकूर साहेब व विश्व हिंदू परिषद क्षेत्रीय मंत्री श्री शंकर जी गायकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत एकवीस हजार २१०००/- रूपयांचा समर्पण निधी सुपुर्द केला.
      ---------------------------
      दिवाळीनिमित्त प्रभागात रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले...!! प्रथम पारितोषिक विजेते : प्रथम पारितोषिक (रोख रु. ५००१ व सन्मानचिन्ह), द्वितीय पारितोषिक (रोख रु. ३००१ व सन्मानचिन्ह), तृतीय पारितोषिक (रोख रु. २००१ व सन्मानचिन्ह) ठेवण्यात आले होते.
      ---------------------------
      मुर्बी गावातील क्रिकेट प्रेमींमार्फत आयोजित "मुर्बी प्रीमियर लीग धमाका २०२०" या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.
      ---------------------------
      राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एक स्वच्छ भारत समर्पित करण्याकरिता कटिबद्ध असलेल्या पनवेल महानगरपालिकेमार्फत आयोजित "स्वच्छता हीच सेवा - पंधरवडा" या मोहिमेत सहभाग घेऊन श्रमदान केले.
      ---------------------------
      विविध दाखले वाटप शिबिराचे आयोजन.
      ---------------------------
      गुणवंत विद्यार्थांचा सत्कार समारंभ.
      ---------------------------
      गरीब व गरजू विद्यार्थांना वह्या वाटप.
      ---------------------------
      पनवेल तहसील कार्यालयामार्फत "मोफत दाखले वाटप शिबीर" आयोजित केले.
      ---------------------------
      रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र प्रदेश राज्यमंत्री श्री.रवींद्रजी चव्हाण (वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, खाद्य आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि बंदरे) यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलचे कार्यसम्राट आमदार व रायगड भाजपा जिल्हाध्यक्ष माननीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ओम नवजीवन हॉस्पिटल से.२१ व गिरीजाघर बालगृह व वृद्धाश्रम से.१२ व संजीवनी हॉस्पिटल से.१२ येथे फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
      ---------------------------
      स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून खारघर मधील श्री. रामशेठ ठाकूर स्कूल येथे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
      ---------------------------
      पनवेलचे कार्यसम्राट आमदार मा.श्री.प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुर्बी येथील जि.प.शाळेमधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी गणवेश वाटपाच्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
      ---------------------------
      रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे तसेच आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळा पेठ खारघर येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.
      ---------------------------
      अन्नदान हेच सर्व श्रेष्ठदान.....या उक्तीचे स्मरण ठेऊन समाजातीलच परंतु स्वतःच्या कुटुंबापासून दूर असलेल्या लोकांप्रती आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रभाग समिती सभापती श्री.अभिमन्यू पाटील यांनी पनवेलचे कार्यसम्राट आमदार मा.श्री.प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर सेक्टर १४ येथील जीवन ज्योती आश्रम मधील निराधार लोकांसाठी अन्नदानाच्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
      ---------------------------

      कोरोना काळातील कामगिरी
      कोरोना विषाणु च्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधीलकी जपत मुर्बी गावातील गरीब गरजू व हातावर पोट असणा-या २५० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
      ---------------------------
      कोरोना विषाणु च्या पार्श्वभूमी वर नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी लोकनेते श्री रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेक्टर १९, २०, २१ खारघर येथील विविध सोसायटी मधिल २१०० कुटुंबांना आर्सेनिक अल्बम ३० ह्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
      ---------------------------
      कोरोना विषाणु च्या पार्श्वभूमी वर नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी सेक्टर ११ खारघर येथील ३५० कुटुंबांना आर्सेनिक अल्बम ३० ह्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
      ---------------------------
      कोरोना विषाणु च्या पार्श्वभूमी वर नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी मुर्बी गावातील 800 कुटुंबांना आर्सेनिक अल्बम ३० ह्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
      --------------------------
      जगभर पसरलेल्या महाभयंकर कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने त्रस्त गोरगरीब व निराधार नागरिकांसाठी खारघर येथे अन्नदान करण्यात आले होते.
      --------------------------
      कोरोना व्हायरसचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता गरीब गरजु व हातावर पोट असणाऱ्या नागरीकांचे भुके मुले हाल होऊ नये म्हणून १ मे महाराष्ट्र व कामगार दिना निमित्ताने मुर्बी गावाजवलील झोपडपट्टीतील गरिब वरजू नागरिकांना जिवनावश्यक वस्तूचे पनवेल विधान सभा कार्यसम्राट आमदार श्री प्रशांत दादा ठाकुर यांच्या आदेशावरुन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह गटनेते श्री परेशदादा ठाकुर साहेब व पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त श्री गणेश देशमुख साहेब यांच्या सहकार्याने पनवेल महानगरपालिके तर्फे वाटप करण्यात आले.
      --------------------------
      कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारला लोक डाऊन-२ चा निर्णय घ्यावा लागला. परंतु हा निर्णय घेतल्यामुळे अनेक छोटे व्यावसायिक, पगार न मिळालेले कुटुंबीय, झोपडपट्टीत राहणारे गरीबवर्ग, घरकाम करणारे तसेच परप्रांतीय यांच्यावर आर्थिक आपत्ती कोसळलेली आहे.
      संवेदनशील आमदार माननीय प्रशांतजी ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वरील गरजू वर्गासाठी मदत म्हणून पोलिस प्रशासन व महानगरपालिका यांच्या परवानगीने पनवेल महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी "कम्युनिटी किचनची" संकल्पना राबविली. खारघर शहरासाठी सेक्टर १२ येथील शिवमंदिर येथे कम्युनिटी किचन सुरू केले होते. त्यात ३५० गरजूंनी याचा लाभ घेतला.
      --------------------------
      खारघर शहर कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांना स‌ॅनिटायझर वाटप करण्यात आले.
      --------------------------
      पनवेल महानगर पालिका मार्फत "COVID-19" कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी मुर्बी गावात औषध फवारणी करण्यात केली.
      --------------------------

      वृक्षारोपण कार्यक्रम
      वृक्ष लागवड व संवर्धन ही समाजातील सर्वच स्तरातील व्यक्ती आणि समूहांची सार्वजनिक जबाबदारी असून त्यासाठी लोकप्रतिनिधी , प्रशासन यांच्याबरोबर लोकसहभागही खूप महत्वाचा आहे. कृषिदिनाच्या निमित्ताने आणि भारत सरकारच्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पाअंतर्गत सर्व्हे नं. १५२ ओवे कॅम्प खारघर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
      --------------------------
      आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी साहेब यांचा जन्मदिवस दि.१७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या दरम्यान भाजपच्या वतीने सेवा पंधरवडा निमित्त भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष मा आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीबूथ क्रमांक ६३ व ६४ तर्फे वृक्ष लागवड करण्यात आली.
      --------------------------
      प्रभाग समिती अ चे मा.सभापती तथा नगरसेवक मा.श्री.अभिमन्यू धर्मा पाटील यांचे चिरंजीव व भाजपाचे युवा नेते श्री.नितेश अभिमन्यू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुर्बी गावातील भूखंड क्र.१६९ अ वरील मैदानामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
      --------------------------
      खारघर सेक्टर 10 मध्ये सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी सिडकोच्या माध्यमातून सेक्टर 10 ला नवीन रस्ते बनवून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच खाडीलगत असलेल्या पोंडच्या आजूबाजूला झाडे लावून आमदार साहेबांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.
      --------------------------
      निसर्गाचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी न्यू सीटी स्कूल, सेक्टर १९, खारघर येथे वृक्षरोपनाचा कार्यक्रम पार पडला.

    • अवॉर्ड / पुरस्कार
      कोविड १९ च्या संकट काळात केलेल्या कार्याची दखल घेऊन डॉ. विशाखा सोशल वेल्फेअर फाउंडेशन द्वारा WHO व भारत सरकारच्या निर्देशानुसार प्रदान केलेल्या सेवांसाठी "राष्ट्रीय कोरोना सेनानी सन्मान" प्रदान केल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद...!!
      --------------------------
      पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव होऊ नये ह्यासाठी संपूर्ण प्रशासन कामाला लागले आहे. प्रशासकीय यंत्रणेवर पडत असलेला आर्थिक भार कमी व्हावा ह्यासाठी मी माझ्या सामाजिक जबाबदारीचे भान राखून दोन महिन्याचे मानधन महापौर निधीला सुपूर्त केला...

      समाजाला कशा प्रकारे मदत करू शकता ?
      युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणे
      शिक्षणासाठी गरजू, गरीब विद्यार्थ्यांना शक्यतोपर मदत
      युवा - युवतींसाठी स्वयंरोजगारासाठी मदत / सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी मदत
      गरजूंना आर्थिक, सामाजिक व कायदेविषयक सहाय्य प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीतीने करता येईल तसेच समाजाला ज्या ज्या वेळी आपली मदत लागेल त्या त्या वेळी आपल्या परीने मदत केली जाईल

      पक्षाच्या व संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम -
      महावितरणाने ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या महाआघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी आज खारघर - तळोजा मंडळ येथील महावितरण कार्यालयावर टाळे ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
      --------------------------
      दहीहंडी उत्सवानिमित्त बाळगोपाळांना प्रोत्साहित करणे व सामाजिक बांधिलकीची जपणूक करणेहेतू खारघर शहर भारतीय जनता पार्टी तर्फे दरवर्षी सेक्टर ७ येथील उत्सव चौक शेजारी भव्य अशा मानाच्या दहीहंडीचे आयोजन केले जाते. 
      --------------------------
      खारघर मॅरेथॉन या भव्य स्पर्धेमध्ये आपल्या सहकारी नगरसेवकांसोबत सहभाग घेतला.या स्पर्धेला नागरिकांचाही उत्फुर्त प्रतिसाद मिळाला व १५,००० पेक्षा जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला.
      --------------------------
      सिडको अध्यक्षपदाची (राज्यमंत्री दर्जा) जबाबदारी स्विकारलेले पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्याबरोबर स्वच्छ भारत योजनेंतर्गत स्वच्छता संवाद पदयात्रा करण्याचा योग आला. ही पदयात्रा नेरे गावातून सकाळी 8 वा. सुरू होवून दुपारी 1.30 वा. समाप्त झाली.सुमारे 12 किलोमीटरची ही पदयात्रा नेरे, आंबीवली, वांगणी, पाली, वारदोली, बेलीवली, सांगडे करित रायगड पेट्रोल पंपामार्गे भिंगारवाडीत समाप्त झाली.
      --------------------------
      भाजपा प्रणित अटल फौंडेशन व ख़ुशी हार्ट केअर सेन्टर यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर सेक्टर १९ मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे हृदयरोग, कर्करोग, नाक, कान, घसा व दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले.
      --------------------------
      भारतीय जनता पार्टी व रिपाई आघाडीचे अधिकृत उमेदवार डाँ. निरंजन डावखरे यांची माहिती पुस्तिका वितरीत करताना व भाजपलाच मतदान करण्याचे आवाहन केले.
      --------------------------
      नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांचे नांव द्यावे, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी व प्रभागातील नागरिकांनी उभारलेल्या लढ्याच्या दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाची जनजागृती व्हावी, यासाठी "९ ऑगस्ट" या क्रांतिदिनीं "मशाल मोर्चा" काढण्यात आला. मोर्चात सक्रिय सहभाग घेतला.

श्री. अभिमन्यू पाटील यांचे छाया चित्र संग्रह...


माझा प्रभाग, माझी जबाबदारी... प्रभागात केलेली विकासकामे...

रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते, लोकनेते, शिक्षण महर्षी श्री.रामशेठ ठाकूर साहेब व पनवेलचे कार्यसम्राट आमदार श्री.प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक २२/०६/२०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते सन्माननीय श्री.परेशशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभहस्ते प्लॅाट क्रमांक १६९ ए या ठिकाणी श्री.अभिमन्यू धर्मा पाटील यांच्या नगरसेवक निधीतून उभारण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राचे व खेळाच्या मैदानाचे उद्घाटन करण्यात येऊन ते नागरिकांच्या सेवेत समर्पित करण्यात आले. तसेच मुर्बी गावातील सीवर लाईन व गटारीच्या कामांचे भूमीपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
---------------------------
पनवेल महानगरपालिका परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या खारघर येथील मान्सून सक्रिय होण्यापूर्वी वेगाने कामे सुरू आहेत. या अनुषंगाने खारघर मधील मुर्बी आणि पेठगाव या भागात नालेसफाईच्या तसेच गावात सुरू असलेल्या रस्ते आणि गटारांच्या कामांची सभागृह नेते मा.श्री.परेश ठाकूर यांनी शनिवारी पाहणी करून आढावा घेतला तसेच या कामासंदर्भात अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
---------------------------
पनवेल महानगरपालिका परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या खारघर शहरालगत असणाऱ्या मुर्बी आणि रांजणपाडा गावामध्ये होणारा पाणीपुरवठा मुबलक प्रमाणात होत नव्हता यासाठी सिडकोला केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे सिडकोमार्फत मुर्बी गाव व रांजणपाडा येथे पाण्याचे नवीन कनेक्शन मंजूर करण्यात आले.
---------------------------
पनवेलचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय श्री.प्रशांतदादा ठाकूर साहेब, सभागृह नेते सन्माननीय श्री.परेशदादा ठाकूर साहेब तसेच महापौर सौ.कविता किशोर चौतमोल यांच्या सहकार्याने व प्रभाग क्रमांक ४ चे मा.प्रभाग समिती सभापती तथा कार्यतत्पर नगरसेवक श्री.अभिमन्यू धर्मा पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे खारघर परिक्षेत्रांतर्गत मुर्बी गावातील स्मशान भूमीचे सुशोभीकरण व प्रतिक्षा दालनाचे भूमीपूजन संपन्न झाले.
---------------------------
पनवेलचे कार्यसम्राट आमदार मा.श्री. प्रशांत ठाकूर साहेब,पनवेल महानगरपालिका महापौर मा. सौ. कविता चौतमोल मॅडम व सभागृह नेता मा. श्री. परेशशेठ ठाकूर यांच्या सहयोगाने मुर्बी गावातील ग्रामस्थांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी महानगरपालिकेमार्फत सुरु असलेल्या लसीकरण केंद्रावर मुर्बी गावातील अनेक ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले.
---------------------------
सिडको मार्फत होत असलेल्या पाणी पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी ऐन दिवाळीत सुद्धा भाऊबीजेच्या दिवशी सिडको जलकुंभाची पाहणी केली.
---------------------------
पनवेल महानगरपालिका अंतर्गत मुर्बी गावातील रा.जि.प.प्राथमिक शाळेतील काही बाबींवर चर्चा करण्यासाठी महानगरपालिका अधिकारी श्री.राजेश कर्डिले यांच्यासह मुर्बी गावातील सदर रा.जि.प.प्राथमिक शाळेचा पाहणी दौरा केला.
---------------------------
पनवेल महानगरपालिका विकास कामांतर्गत मुर्बी गावाचा स्मार्ट सिटी मध्ये समावेश करून गावाचा सर्वांगीण विकास करण्याचे महानगरपालिकेने मंजूर केले होते. परंतु गेल्या १ ते दीड वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे निर्णयावर कोणतीही कार्यवाही झाल्याचे निदर्शनास आले नाही...म्हणून किमान आतातरी स्मार्ट सिटी अंतर्गतची मुर्बी गावातील सदर विकासकामे लवकरात लवकर सुरु करावी अशी विनंती सभागृह नेते मा.श्री.परेशशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने महानगरपालिका आयुक्त मा.श्री. गणेशजी देशमुख यांना पत्राद्वारे केली.
---------------------------
आमदार मा.श्री.प्रशांत ठाकूर साहेब व सभागृह नेते मा. श्री. परेश ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार केलेल्या पत्र व्यवहारास सिडकोचा तात्काळ प्रतिसाद मिळाला. मुर्बी गावातील विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याचे दुरुस्ती काम पूर्ण करून घेतले.
---------------------------
सातत्यपूर्ण पाठपुराव्याने व पनवेलचे कार्यसम्राट आमदार मा.श्री.प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व पनवेल महानगरपालिकेचे गटनेते परेशदादा ठाकूर यांच्या सहकार्याने मुर्बी गावातील स्मशान भूमीतील पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यात आले.
---------------------------
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना वाढीव मालमत्ता करातून सूट मिळणेबाबत मा.उपायुक्त साहेबांना निवेदन दिले.
---------------------------
गेल्या काही दिवसांपासून खारघर सेक्टर १३, १४, १९, २० आणि २१ मध्ये पाण्याची समस्या हि गंभीर झालेली असून परिसरातील नागरिक हे पाण्याचा तुटवडा व कमी दाबाच्या समस्येमुळे त्रस्त झाले होते ज्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या तक्रारी येत असून सिडको प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करूनही काही ठोस अशी कार्यवाही झाली नाही, म्हणून खारघरचे सर्व सन्मानित नगरसेवक भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून पाण्याचे समस्येबद्दल जाब विचारला व सदर समस्या लवकरात लवकर न सुटल्यास मोठ्या स्वरूपाचा मोर्चा हा सिडकोवर आणू, असा इशारा दिला.
---------------------------
मुर्बी गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून नाल्यांची दुरावस्था झाली होती. ज्यामुळे तेथील नागरिकांना बऱ्याच समस्यांना जावे लागत होते. या आशयाच्या तक्रारी वारंवार ग्रामस्थांनाकडून कळताच तसेच नागरिकांच्या आरोग्याचे गांभीर्य लक्षात ठेवून तत्परतेने पनवेल महानगरपालिका प्रशासन व्यवस्थेशी संपर्क साधला व योग्य तो पाठपुरावा करून ताबडतोब सदर नाल्याच्या साफसफाईचे काम स्वतःसमक्ष उभे राहून करून घेतले.
---------------------------
BPCL CSR फंडातून मुर्बी गाव सेक्टर १९ येथील भूखंड क्रमांक १६९ अ वरील खेळाच्या मैदानामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी ई-टॉयलेट उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
---------------------------
मुर्बी गाव व आसपासच्या परिसरातील मुलांसाठी गावामध्ये चालू असलेल्या रा.जि.प.प्राथमिक शाळेची दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी प्रशासनाच्या परवानगीने रोटरी क्लब खारघर यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार एकूण खर्चापैकी १०% रक्कम हि स्थानिक ग्रामस्थ व प्रभाग समिती अ चे मा. सभापती तथा नगरसेवक मा.श्री.अभिमन्यू धर्मा पाटील यांच्यातर्फे व उर्वरित रक्कम रोटरी क्लब खारघर तर्फे देण्याचे ठरले. याच कामकाजाचे प्रभाग समिती अ चे मा.सभापती तथा नगरसेवक मा.श्री.अभिमन्यू धर्मा पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला.
---------------------------
खारघर प्रभाग क्र.४ येथील सेक्टर १९, २० व २१ मध्ये वादळी पावसाने अस्ताव्यस्त पडलेली झाडे, लाईटचे खांब व इतर गोष्टी यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासातून तात्काळ सोडविण्यासाठी लोकनेते माजी खासदार श्री.रामशेठ ठाकूर,आमदार श्री.प्रशांतदादा ठाकूर व महानगरपालिका गटनेते श्री.परेश ठाकूर यांनी टी.आय.पी.एल.कंपनीमार्फत ४ डम्पर, १ जेसीबी व २ ट्रॅक्टर पाठवून महानगरपालिका प्रभाग समिती (अ) चे मा.सभापती तथा नगरसेवक श्री.अभिमन्यू धर्मा पाटील यांच्यामार्फत सदर ठिकाणांची साफसफाई व स्वच्छता करवून घेतली.
---------------------------
कोरोना व्हायरस या महाघातक विषाणू आणि त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर निर्माण होणार प्रश्नचिन्ह या बाबींचा गांभीर्याने विचार करता महानगरपालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेशी स्वतः संपर्क साधून सेक्टर १९ मुर्बीगाव येथे धूरफवारणी करवून घेतली.
---------------------------
मुर्बी गावातील नागरिकांसाठी असलेल्या पाण्याच्या पाईपलाइनद्वारे येणाऱ्या पाण्यामधून जंतू व सांडपाण्याचे काही अंशी मिश्रण येत असल्याचे ग्रामस्थांनी कळवताच तसेच नागरिकांच्या आरोग्याचे गांभीर्य लक्षात ठेवून तत्परतेने प्रशासन व्यवस्थेशी संपर्क साधला व सदर पिण्याच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम स्वतःसमक्ष उभे राहून करून घेतले.
---------------------------
खारघर सेक्टर १३, भूखंड क्र. १२७ येथील तुंबलेल्या ड्रेनेजलाईन मुळे परिसरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाची गांभीर्याने दखल घेत तत्काळ सिडको प्रशासनाशी संपर्क साधून सिडकोचे सहाय्यक कार्यकारी अभियंता सागर साहेब यांच्या सहकार्याने सदर ड्रेनेज लाईनची साफसफाई करवून घेतली.
---------------------------

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    0 0 votes
    Article Rating
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x