|  Prakash Ambedkar

prakash-ambedkar-1
bharip-log0

Name : 

प्रकाश यशवंत आंबेडकर

Constituency :

अकोला लोकसभा मतदारसंघ

Party Name :

भारिप बहुजन महासंघ  |  वंचित बहुजन आघाडी

Designation : 

अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : प्रकाश यशवंत आंबेडकर

Father's Name : यशवंत आंबेडकर

Mother’s Name : मिराबाई आंबेडकर

Date of Birth: :  १० मे १९५४

Place of Birth :  मुंबई, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. अंजली आंबेडकर

No. of Children : सुजात आंबेडकर

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : बी.ए, एल्‌एल.बी.

Profession : राजकारणी व वकील

Hobby : समाजसेवक, सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य

Residence Address : यशवंत भवन, कृषिनगर, अकोला

Office Address : पहिला मजला, ठाकरसे हाऊस, बॅलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र ४००००१

Phone No. : +91 9422 85 9580

राजकीय कारकीर्द
1990-96 : नामनिर्देशित सदस्य, 18-9-1990 ते 17-9-1996 पर्यंत राज्यसभा.
1993-96 : सदस्य, नियम समिती.
1993-96 : सदस्य, कम्युनिकेशन समिती.
1998 : 12व्या लोकसभेसाठी निवडून आले.
1999-99 : सदस्य, अन्न, नागरी पुरवठा आणि सार्वजनिक वितरण समिती; सदस्य, सल्लागार समिती, मनुष्यबळ विकास मंत्रालय.
1999 : 13व्या लोकसभेसाठी पुन्हा निवडून आले (दुसरा टर्म), नेता, भारिप बहुजन महासंघ संसदीय पक्ष, लोकसभा. 1999-2000 : सदस्य, ऊर्जा समिती.
2000 : सदस्य, सल्लागार समिती, रेल्वे मंत्रालय.

भारिप बहुजन महासंघ
१९९४ पूर्वी प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षात कार्यरत होते. त्यांनी ४ जुलै १९९४ रोजी भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली.
१९९३-९४ च्या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना-भारतीय जनता पक्ष या राजकीय पक्षांना मात देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी भारतीय रिपब्लिकन पक्षाची वेगळ्या पद्धतीने बांधणी करून 'अकोला पॅटर्न' राबविला आणि जिल्हा परिषदसारख्या स्थानिक स्वराज राजकारणात प्रभाव निर्माण केला. त्यानंतर १९९५ च्या आसपास याचा विस्तार करत काही दलितेतर पक्ष आणि संघटनांना सामील करून घेऊन 'भारिप-बहुजन महासंघाची' मोट बांधली.

वंचित बहुजन आघाडी
आंबेडकर यांनी २०१८ मध्ये वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाची स्थापन केली. जवळजवळ १०० लहान राजकीय पक्ष व सामाजिक संघटना बहुजन वंचित आघाडी सोबत आहेत. पक्षाने, एआयएमआयएम या मित्रपक्षासह सन २०१९ मधील, १७व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवल्या होत्या. एआयएमआयएम चा एकमेव उमेदवार निवडूण आला मात्र वंबआचे सर्व उमेदवार पराभूत झाले. बऱ्यांच उमेदवारांवर १ लाखांवर मते घेतली होती. 

१४ मार्च २०१९ रोजी, प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघ पक्षाला वंचित बहुजन आघाडी या पक्षात विलीन करण्याचे जाहीर केले. आंबेडकर म्हणाले की, "भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून सामाजिक अभियांत्रिकीचा 'अकोला पॅटर्न'ला यश मिळाले असले तरी भारिप या शब्दामुळे पक्षाच्या विस्ताराला मर्यादा आल्यात." त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही व्यापक अर्थाने स्वीकारार्ह झाली असल्याने २०१९ च्या १७व्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप बहुजन महासंघ विलीन करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

या पक्षाचे महाराष्ट्राच्या विधानसभांवरील निवडूण आलेले उमेदवार
२०१४ मध्ये, १३व्या विधानसभेवर एक सदस्य निवडून गेला होता - बळीराम सिरस्कार
२००९ मध्ये, १२व्या विधानसभेवर एक सदस्य निवडून गेला होता - हरिदास पंढरी भदे (अकोला पूर्व)
२००४ मध्ये, ११व्या विधानसभेवर एक सदस्य निवडून गेला होता - भडे हरिदास पंढरी (बोरगाव मंजू)
१९९९ मध्ये, १०व्या विधानसभेवर तीन सदस्य निवडून गेले होते - रामदास मणिराम बोडखे (अकोट), दशरथ मोतीराम भांडे (बोरगाव मंजू) आणि, वसंत धोडा सूर्यवंशी (साक्री).

राजकीय पक्ष
भारतीय रिपब्लिकन पक्ष (१९९४ पूर्वी; १९९८-९९)
भारिप बहुजन महासंघ (१९९४-२०१९)
वंचित बहुजन आघाडी (२०१९ पासून पुढे)

भारिप बहुजन महासंघ
- १९९४ पूर्वी प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षात कार्यरत होते. त्यांनी ४ जुलै १९९४ रोजी भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली.
- १९९३-९४ च्या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना-भारतीय जनता पक्ष या राजकीय पक्षांना मात देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी भारतीय रिपब्लिकन पक्षाची वेगळ्या पद्धतीने बांधणी करून 'अकोला पॅटर्न' राबविला आणि जिल्हा परिषदसारख्या स्थानिक स्वराज राजकारणात प्रभाव निर्माण केला. त्यानंतर १९९५ च्या आसपास याचा विस्तार करत काही दलितेतर पक्ष आणि संघटनांना सामील करून घेऊन 'भारिप-बहुजन महासंघाची' मोट बांधली.

लेखन साहित्य
प्रकाश आंबेडकर यांनी अनेक पुस्तके लिहीली आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
- आंबेडकरी चळवळ संपली आहे
- अंधेरी नगरी चौपट राजा
- महाराष्ट्राचा उद्याचा मुख्यमंत्री वारकरी आणि वारकरीच
- कॅन इट बी स्टॉप्ड!
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक भष्टाचार
- ऐतिहासिक आंबेडकर भवनाचा वारसा आपण जपणार की नाही??

त्यांच्यावरील पुस्तके
प्रकाशपर्व (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं चरित्र, लेखक उमेश चव्हाण)

Comming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    0 0 votes
    Article Rating
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x