Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Shiv Sena

Back

पार्टीचे नाव : शिवसेना

स्थापना : १९ जून १९६६, बाळासाहेब ठाकरे

अध्यक्ष : श्री उद्धव ठाकरे

मुख्यालय: शिवसेना भवन, दादर, मुंबई.

राजकीय तत्त्वे : हिंदुत्व

  स्थापना

 • शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची पूर्ण जबाबदारी उद्धव ठाकरे संभाळत आहेत तर युवासेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे हे तरुणांचे संघटन करीत आहेत.
 • १९ जून १९६६ रोजी शिवसेनेचा जन्म झाला. छ्त्रपती शिवाजी महाराज हे शिवसेनेचं आराध्य दैवत. महाराज भवानी मातेचे प्रखर भक्‍त होते. ‘वाघ’ हे आई भवानीचं वाहन. म्हणून शिवसेनेचं बोधचिन्ह ‘वाघ’ असावं असं बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात आलं. वाघ म्हणजे रुबाब, मस्ती अन्‌ आक्रमकपणा. शिवसेनेचे सार व्यक्त होणार्‍या बोधचिन्हाला खुद्द बाळासाहेबांनीच साकारले. शिवसेना हे नाव बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनीच सुचवले होते.
 • महाराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी सिद्ध झालेल्या शिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवतीर्थावर आयोजित करण्यात आला. ‘मार्मिक’ वगळता इतर कोणत्याही वर्तमानपत्रात शिवसेनेच्या शुभारंभाच्या मेळाव्याची घोषणा अथवा जाहिरात नव्हती. तरीही मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अन्य भागांतून मेळाव्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. शिवाजी पार्क खच्चून भरलेले, रस्ते तुंबले, गल्ल्या भरल्या होत्या. महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्फूर्तिदायक चरणांवर प्रतिज्ञेचा माथा ठेवून दृष्ट लागवी असा स्थापना मेळावा झाला.
 • चैतन्यमय आणि संघर्षशील असे शिवसेनेचे सुरुवातीचे दिवस होते. पहिली सभा दणक्यात झाली. त्यानंतर मराठी तरुणांचे तांडे शिवसेनेकडे वळू लागले. ‘मार्मिक’वर वाचकांच्या उड्या पडत होत्या. बाळासाहेबांच्या वाणीला आणि शब्दांना एक वेगळीच धार चढत होती. व्यायामशाळा, स्थानिक क्रीडा संस्था अन्‌ गणपती-गोविंदा मंडळं यांच्या मदतीने सेनेचं ‘नेटवर्किंग’ जोरात सुरू झालं होतं. मराठी माणसांचं हक्काचं माहेरघर म्हणून शिवसेनेची घोडदौड सुरू झाली.
 • बाळासाहेब आणि शिवसेना म्हणजे राजकीय आविष्कार… हिंदुत्वाचा झंझावात, शिवसेना म्हणजे घटनांची रेलचेल, अनंत आंदोलने, असंख्य जाहीर सभा, मेळावे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा कणखर बाणा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंचे नेतृत्वकौशल्य, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा करिष्मा, शिवसेनेच्या कुटुंबाचा एकोपा, शिवसैनिकांची निष्ठा, मराठी माणसांचा विश्वास… हीच आपली शिवसेना…एक भगवा झंझावात! शिवसेनेचा मराठी माणसाशी असणारा संबंध अतूट राहिला आहे. इतक्या वर्षांत तीन पिढ्या तरुण होऊन गेल्या. येणारी प्रत्येक पिढी नव्याने इमान घेऊन शिवसेनेत सामील होत आहे. या भगव्या झंझावातास थांबविण्याची ताकद कोणाकडेही नाही.
 • महाराष्ट्र हे मराठी माणसांचं राज्य आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी. असे असतानाही मुंबईत मराठी माणूस अपमानित जिणं जगत होता. १९६१ च्या शिरगणतीनुसार मुंबईतला मराठी टक्का कमी झाला होता. शहरात बिगर मराठी लोकांचं प्रमाण ५७ टक्क्यांहून अधिक इतकं झालं होतं. हा अमराठी टक्का सरकारी नोकर्‍यांवर खुलेआम डल्ला मारत होता. तत्कालीन काँग्रेस पुढार्‍यांना मुंबईची आणि मुंबईतल्या मराठी माणसाची पर्वा नव्हती. या नेतेमंडळींचं सगळं राजकारण ग्रामीण महाराष्ट्रात रुजलं, फोफावलं होतं. मराठी मन अस्वस्थ होतं. या विषयावर ‘मार्मिक’चं कॅम्पेन तुफान होतं. बाळासाहेबांचे दौरे सुरू होते. व्याख्यानं, सभा असा त्यांचा तडाखेबंद कार्यक्रम असायचा. विचारांचा जाळ पेटला होता. चळवळीचा व्याप तर वाढतच होता. मराठी माणूस पुरता कातावून गेला होता. आतल्या आत धुमसत होता. वातावरण तापलं होतं. मराठी माणसाला मन्वंतराचे वेध लागले होते आणि राजकारण अशा दिशेने चाललं होतं की, मराठी माणसांच्या संघटनेशिवाय चालण्यासारखं नव्हतं किंबहुना ती काळाची गरज होती. महाराष्ट्रात निर्माण झालेले मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे वातावरण केवळ व्यंगचित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी संघटित प्रयत्न करायला हवेत, असा विचार बाळासाहेबांनी केला. हर हर महादेवची गर्जना मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा घुमायला हवी आणि प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा, या हेतूनेच प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवसेना हे नाव सुचवले होते.
 • समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार आहे. महाराष्ट्रात पैसा आहे, पण मराठी माणूस गरीब आहे, ही परिस्थिती जाणून ती बदलण्यासाठी हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न केले. मराठी माणूस महाराष्ट्रात, प्रामुख्याने मुंबईत अपमानित होतो आहे, हे बाळासाहेबांनी महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आणून दिले आणि मराठी माणसाला संघटित केले. शिवसेनेचा पहिला मेळावा १९६६ साली शिवतीर्थावर झाला, तेव्हापासून आजपर्यंत मराठी माणसांचे शिवसेनेशी जुळलेले नाते आजही कायम आहे.
  ध्येय

 • आम्ही हिंदुस्थानी आहोत म्हणून हिंदुत्व हा आमच्या पक्षाचा मुख्य पाया आहे.
 • या राष्ट्राच्या विरोधात असणाऱ्यांशी शिवसेनेची लढाई ही अखंड चालू राहील.
 • स्वत:च्या हक्कासाठी उभारणीसाठी शिवसेना नेहमी प्रोत्साहन देईल.
 • समाजसेवा व सामाजिक ऐक्य हेच समाज विकासाचे मार्ग आहेत असा शिवसेनेचा ठाम विश्वास आहे म्हणून सक्रिय राजकारणापेक्षा जास्त सामाजिक चळवळीवर शिवसेनेचा अधिक भर आहे.
 • धर्म, जात व भाषा यामधल्या किरकोळ मतभेदांवर शिवसेनेचा बिलकुल विश्वास नाही. उलट याला कुणीही बळी पडू नये अशीच शिवसेनेची शिकवणूक आहे.
 • राज्याच्या अधिकृत भाषेमध्ये तरुणांना शिक्षण मिळावयास हवे.
  धोरणे

 • मातृभूमीबद्दल असलेल्या जबाबदाऱ्या व कर्तव्य याची जाणीव असलेला शक्तिमान, ताठ मानेने चालणारा तसेच सुसंस्कृत तरुण उभा करणे.
 • मातृभूमीसाठी केव्हाही कसलाही त्याग करावयास तयार असलेली एक शक्तिशाली संघटना निर्माण करणे.
 • राजकारण वा सत्ता नव्हे, तर समाजसेवा हेच अंतिम ध्येय आहे, अशी भावना समाजात निर्माण करणे.
 • समाजविघातक, राष्ट्रविघातक शक्तीविरुद्ध तसेच भ्रष्टाचार, अयोग्य व लालफितीत अडकलेल्या प्रशासनाच्या विरोधात ठामपणे मुकाबला करण्याची एक जाणीव समाजामध्ये निर्माण करणे.
 • युवा पिढीमधील नैराश्य हटवून त्याच्या मनामध्ये असा आत्मविश्वास निर्माण करणे की ते बेकारी, अशिक्षितपणा व गरिबीविरुद्ध लढा देऊ शकतील. त्यांना शिक्षण व विविध क्षेत्रात प्रशिक्षण देणे.
 • राष्ट्रीय हितसंबंध जपणे, कायद्याला मान देणे व संपूर्ण राष्ट्रासाठी सक्रिय सामाजिक कायदा असावा याबद्दल आग्रही असणे. समाजामध्ये बंधुत्व, एकसंधपणा व सुसंवाद प्रस्थापित करणे.
  निवडणूक चिन्ह

 • "धनुष्यबाण" हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे.

Assembly Members Maharashtra (Shiv Sena) / विधानसभा सदस्य महाराष्ट्र (शिवसेना)

शिवसेना नेते

मनोहर जोशी
लीलाधर डाके
दिवाकर रावते मंत्री, परिवहन, खार जमीन विकास
संजय राऊत राज्यसभा सदस्य
सुधीर जोशी (हृदगत)
सुभाष देसाई शिवसेना नेते व उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य
रामदास कदम पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य
गजानन कीर्तिकर शिवसेना नेते व खासदार, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्र

शिवसेना उपनेते

अनंत गीते
सुरेश प्रभु
अनंत तरे
विलास अवचट
विश्वनाथ नेरुरकर
यशवंत जाधव
आनंदराव अडसुळ
बबनराव घोलप
गुलाबराव पाटील
दशरथ शिर्के
विजय कदम
मीना कांबळी
सुहास सामंत
लक्ष्मण वडले
सुर्यकांत महाडिक
अरविंद सावंत
रविंद्र मिर्लेकर
विनोद घोसाळकर
चंद्रकांत खैरे
अनिल राठोड
अशोक शिंदे
डॉ. नीलम गोऱ्हे
सौ. विशाखा राऊत
विवेक पंडीत
श्रीकांत सरमळकर

शिवसेना सचिव

अनिल देसाई
आदेश बांदेकर
विनायक राऊत

शिवसेना प्रवक्ते

मनोहर जोशी
संजय राऊत
सौ. श्वेता परुळेकर
सुभाष देसाई
डॉ. नीलम गोऱ्हे

मा. शिवसेना पक्ष प्रमुख यांचे जनसंपर्क प्रमुख

श्री. हर्षल प्रधान शिवसेना भवन, दादर - मो. ९८६९२३५१७१ / ०२२-२४२२५२६७

Shiv Sena District President comming soon...

Regionwise District Shiv Sena Presidents Chart

Sr. Region City DCC Rural DCC TOTAL
1 Konkan
2 Nashik
3 Amravati
4 Nagpur
5 Marathwada
6 Western Maharashtra
7 Mumbai Regional
- - -

KONKAN REGION

Sr. Name District
1
2
3
4
5
6
7
8
9
10

NASHIK REGION

Sr. Name District
1
2
3
4
5
6
7
8
9
10

AMARAVATI REGION

Sr. Name District
1
2
3
4
5
6
7

NAGPUR REGION

Sr. Name District
1
2
3
4
5
6
7
8

MARATHWADA REGION

Sr. Name District
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12

WESTERN MAHARASHTRA REGION

Sr. Name District
1
2
3
4
5
6
7
8
9
10

MUMBAI REGION

Sr. Name District
1
2
3
4
5
6

शिवसेना अंगीकृत संघटना

Shiv Sena Frontal Organization

Sr. No. Frontal Organisations President
1
2
3
4
5

Comming Soon...

सेल व विभाग अध्यक्ष

अनु. विभाग विभाग अध्यक्ष
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20

Photo Gallery