Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Ranjit Bhalchandra Naik

 

दि. ८ एप्रिल, २०१९ Back

Name : रणजित भालचंद्र नाईक

Constituency : १५१, बेलापूर विधानसभा, वार्ड - ९२, ९९, १००

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : महामंत्री युवा मोर्चा, नवी मुंबई

E-mail : ranjitnaik@gmail.com

Name : रणजित भालचंद्र नाईक

Father's Name : भालचंद्र नाईक

Mother’s Name : हौसाबाई नाईक

Date of Birth: : २१ ऑगस्ट, १९८५

Place of Birth: : दारावे गाव, नेरुळ, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. प्रणिता रणजित नाईक

No. of Children : ०१

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : एस.वाय.बी.ए.

Profession : बिल्डर अन्ड डेव्हलोपमेंट, रियल इस्टेट

Hobby : क्रिकेट, वाचन, सामाजिक कार्य

Residence Address : सेक्टर २३, दारावे गाव, नेरुळ, नवी मुंबई - ४००७०६

Office Address : शिवम क्लासिक सो., प्लॉट नं. सी/६, शॉप नं. ०७, सेक्टर - २३, दारावे गाव, नेरुळ, नवी मुंबई - ४००७०६

Phone No. : +91 9867916046 +91 9867916046

  राजकीय कारकीर्द

 • जिल्हा सरचिटणीस महामंत्री - युवा मोर्चा नवी मुंबई
 • जिल्हा उपाध्यक्ष, युवा मोर्चा नवी मुंबई
 • वॉर्ड अध्यक्ष, नेरुळ (पूर्व)

  सामाजिक कार्य

 • माझ्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चा नवी मुंबई आणि कायाकल्प हेल्थ केयर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीराचे दारावे गाव मधील कै. मास्टर विनायक नाईक विद्यालय येथे आयोजन केले. या शिबिरामध्ये पुरुष आणि महिलांची मोफत मधुमेह, दमा, ब्लडप्रेशर, हृदयरोग, अस्तिरोग, कॅन्सर, मोतीबिंदू, नेत्ररोग, कमजोर दृष्टी, स्रीरोग, मासिक पाळीतील अनियमितता, गर्भाशय आजार तपासणी करण्यात आली.
 • माझ्या वाढदिवसानिमित्त दारावे गाव मधील कै. मास्टर विनायक नाईक विद्यालय येथे नवी मुंबई शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थींना रणजित नाईक आणि प्रणिता नाईक यांच्या तर्फे स्कुल बॅगचे वाटप केले.
 • दारावे सीवूड्स येथे वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी झाडे लावा, जगवा या शिबिराचे आयोजन केले तसेच स्वखर्चातून पाणी वाटप व वृक्ष लागवडीसाठी लागणाऱ्या सर्व उपकरणांची सोय करून दिली.
 • दारावे सीवूड्स मध्ये सेक्टर १९, २१, २३, २५ आणि २७ मधील रहिवाशांसाठी विशेष मतदार नोंदणी, मतदार ओळखपत्र शिबीर - नवीन मतदार नोंदणी, मतदार ओळखपत्र बनविणे, मतदार ओळख पत्रातील दुरुस्त्या करण्यासाठी शिबिराचे आयोजन केले.
 • दिवाळी निमित्त नवी मुंबईतील शेकडो फेरीवाल्यांना फराळ वाटप करून दिवाळी सण साजरा केला.
 • दारावे गावात एकाच रात्री ७ घरफोड्या झाल्या. त्यातच पाकिटे लंपास करण्याचे प्रकार खुलेआम घडत आहेत. याबाबत पोलिसांनी तातडीने पावले उचलावी, रात्रीची गस्त वाढवावी यासाठी नेरुळ पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलिसांना निवेदन दिले.
 • सीवूड दारावे सेक्टर २३ मधील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
 • दारावे गाव, नेरुळ येथे सफाई कामगाराच्या हस्ते ध्वजारोहन आणि राष्ट्रगीताचा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
 • सीवूड सेक्टर २७ आणि बेलापूर ब्रिज दरम्यान काही कारणास्तव खोदकाम केलेले पुन्हा पूर्ववत दुरुस्ती करण्याची पालिका अधिकाऱ्यांना मागणी केली.
 • विभागातील महिलांसाठी हळदी कुंकु समारंभाचे, भव्य नृत्य स्पर्धांचे आयोजन केले.
 • १० वी आणि १२ वी परीक्षार्थींना बेस्ट उपक्रम आणि एनएमएमटी प्रवासात सूट द्यावी यासाठी पालिका आयुक्तांना निवेदन दिले.
 • शिवजयंती निमित्त नेरुळ येथील मीनाताई ठाकरे माता व बाल रुग्णालयात फळ वाटप केले.
 • बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळविण्यासाठी अद्यापपर्यंत तीन रोजगार मेळावे आयोजित केले त्या मेळाव्यात ५० पेक्षा अधिकांना नोकरी मिळाली आहे.

  समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

 • रुग्णांसाठी स्वखर्चाने रुग्णवाहिका सेवा पुरवितो तसेच सीवूड, दारावे, नेरुळ परिसरातील गोरगरीब व्यक्तींचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या घरपोच अंतिम संस्कारासाठी लागणारे साहित्य मोफत पुरविण्याचा उपक्रम राबविण्याचा मानस आहे
 • युवा पिढीला सर्वतोपरी मदत करण्याचे काम नेहमीच करीत आहे. यामध्ये मुले-मुलींना शाळा कॉलेज मध्ये प्रवेश मिळवून देणे, मुद्रा योजना, शासकीय योजनांची माहिती तरुण तरुणींना देण्याचे काम करीत आहे.

  आपला आगामी संकल्प काय आहे ?

 • सुमारे २० हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या दारावे, सीवूड्स परिसरात नवी मुंबई महापालिका रुग्णालय नाही. दारावे मध्ये असलेले नागरी आरोग्य केंद्र बंद करण्यात आलेले आहे. परिणामी दारावे मधील रुग्णांना नेरुळ मध्ये जावे लागते. रुग्णांचा त्रास वाचविण्यासाठी दारावे गावामध्ये ५० ते ६० खाटांचे महापालिका रुग्णालय बनविण्यास आपण प्रयत्नशील आहे.
 • दारावे गावामधील नागेश्वर तलावाजवळ जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे.
 • केंद्र आणि राज्य सरकारी योजना दारावे परिसरातील प्रत्येक घरात पोहचविण्यासह दारावे गाव मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प केला आहे.

  पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम

 • वेगवेगळ्या प्रश्नांसाठी वेगवेगळ्या पक्षातील नेते मंडळींशी भेटून प्रश्न सोविण्याचा प्रयत्न केला.
 • पक्षातील सर्व आंदोलनात, उपक्रमात, पक्षाच्या बैठका, विविध शिबीरात सर्क्रीय सहभाग.
 • पक्षाच्या सर्व मिटिंग, कार्यक्रमात सहभाग.

Photo Gallery


Video Gallery


  आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...