Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

मा. मुख्यमंत्री, श्री पृथ्वीराज चव्हाण

Back

नाव : श्री. पृथ्वीराज चव्हाण

मतदारसंघ : कराड, जि. सातारा.

राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पद : मा. महाराष्ट्राचे २६ वे मुख्यमंत्री

E-mail : chiefminister@maharashtra.gov.in

नाव : श्री. पृथ्वीराज चव्हाण

जन्म दिनांक : १७ मार्च १९४६

जन्म ठिकाण : इंदोर, मध्य प्रदेश, भारत.

कौटुंबिक माहिती : वडिल – स्व. दाजीसाहेब उर्फ आनंदराव चव्हाण, ११ वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात. पं. जवाहरलाल नेहरूंचे सहकारी,

आई – स्व. प्रेमलाकाकी चव्हाण, माजी खासदार.

वैवाहिक स्थिती : दिनांक १६ डिसेंबर १९७६ रोजी श्रीमती सत्वशीला यांच्या बरोबर विवाह.

अपत्ये : एक मुलगा व एक मुलगी.

शिक्षण : भारतातील पिलानी येथील बिर्ला विज्ञान व तंत्रज्ञान (बीआयटीएस) संस्थेमधून बी.ई.(ऑनर्स),

अमेरिकेत बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून मास्टर पदवी.

ज्ञात भाषा : मराठी, हिंदी आणि इंग्रजी

व्यवसाय : अभियंता आणि तंत्रज्ञ.

विशेष आवड : भाषांच्या संगणीकरणाविषयी संशोधन.

राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,

१९७३ पासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य.

कायमचा पत्ता : पाटण कॉलनी, शनिवार पेठ, कराड, जि. सातारा, महाराष्ट्र ४१५४१०

निवासस्थानाचा पत्ता : "वर्षा", मलबार हिल, भाऊसाहेब हिरे मार्ग, मुंबई – ४०० ००६.

कार्यालयाचा पत्ता : मुख्यमंत्र्यांचे कार्यालय, १ ला मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२.

छंद : क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुध्दिबळ, गोल्फ आणि वाचन.

धारण केलेली पदे :

 • १९९१–लोकसभेचे (१० व्या) सदस्य म्हणून निवड.
 • १९९१-९६ –विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि अणुऊर्जा सल्लागार समितीचे सदस्य.
 • १९९२-९३ -पर्यावरण आणि वने या विज्ञान व तंत्रज्ञान समितीवर सदस्य.
 • १९९४-९६ -वित्त आणि नियोजन यावरील स्थायी समितीचे सदस्य, ग्रामीण आणि नागरी विकास स्थायी समितीचे सदस्य.
 • १९९५-९६ -सार्वजनिक उपक्रम समितीचे तसेच दुय्यम विधि-विधान आणि कामकाज सल्लागार समितीवर सदस्य.
 • १९९६-९७ -लोकसभेचे (११ व्या) सदस्य म्हणून फेरनिवड आणि लोकसभेचे उपमुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती आणि काँग्रेस संसदीय पक्षाचे सदस्य, ऊर्जा समितीवर आणि वित्त मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर सदस्य.
 • १९९६-९७ आणि १९९८-२००० - लोक लेखा समितीवर सदस्य.
 • १९९६-९८ - काँग्रेस संसदीय पक्षाचे सचिव
 • १९९६-९९ - संसद सदस्यांना संगणकांचा पुरवठा करणा-या समितीचे सदस्य.
 • १९९७ – विशेष निमंत्रित आणि नियोजन व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य.
 • १९९८-९९ –लोकसभेचे (१२ व्या) सदस्य म्हणून फेरनिवड आणि गृह कार्य मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य आणि शासकीय आश्वासन समितीचे सदस्य (नोव्हेंबर २०, १९९८ मध्ये राजीनामा).
 • १९९८-९९ आणि एप्रिल २००२ ते फेब्रुवारी २००४—वित्तीय समितीचे सदस्य.
 • २०००-०१- अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रवक्ते (एआयसीसी).
 • एप्रिल २००२ – राज्यसभेचे सदस्य म्हणून निवड.
 • ऑगस्ट २००२-फेब्रुवारी २००४ – संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य.
 • मे २००४ ते २२ मे २००९ आणि २८ मे २००९ च्यापुढे – पंतप्रधान कार्यालयामध्ये राज्य मंत्री.
 • सप्टेंबर २००७ च्यापुढे – काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य (सीडब्लूसी) आणि एआयसीसीचे प्रमुख कार्यवाह.
 • एप्रिल २००८ – राज्यसभेचे सदस्य म्हणून फेरनिवड.
 • एप्रिल २००८-२२ मे २००९ – कार्मिक, सार्वजनिक गा-हाणी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयात राज्य मंत्री (अतिरिक्त कार्यभार).
 • २८ मे २००९ च्यापुढे – विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्य मंत्री (स्वतंत्र कार्यभार); भू-विज्ञान मंत्रालयाचे राज्य मंत्री (स्वतंत्र कार्यभार); कार्मिक, सार्वजनिक गा-हाणी व निवृत्ती वेतन मंत्रालयात राज्य मंत्री; संसदीय कार्य मंत्रालयात राज्य मंत्री.
 • ११ नोव्हेंबर २०१० - महाराष्ट्राचे २६ वे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी.
 • २८ एप्रिल २०११ - महाराष्ट्र विधानपरिषदेवर बिनविरोध निवड.
 • ३० एप्रिल २०११ - विधानपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ.
 • ६ मे २०११ - राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा.

परदेश प्रवास :
अमेरिका, फ्रान्स, जपान, युके, पाकिस्तान, बांगलादेश, तैवान, जर्मनी, श्रीलंका, नेपाळ, ओमान, बहामा, चीन, हाँगकाँग, इंडोनेशिया, इटाली, मलेशिया, नेदरलँड, पनामा, पोर्तुगाल,सिंगापूर, स्वित्झरलँड, थायलँड या देशांना विविध परिषदांच्या निमित्त भेटी.

Photo Gallery


Video GalleryNot Available Personal Website