Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Hindusthan Praja Paksha

Back

Party Name : हिंदुस्थान प्रजा पक्ष

Founded : 2008 by प. पु. श्री. उदयनाथजी महाराज

Chairperson : श्री. प्रतापराव (दादासाहेब) चव्हाण

Headquarters : कामोठे, नवी मुंबई - ४१० २०९

ECI Status : राष्ट्रीय पक्ष

  चला उद्याचा सामर्थ्यवान हिंदुस्थान घडवूया ! सुरवात महाराष्ट्रापासून करूया...!!

 • १९५७ साली पहिले स्वतंत्रयुद्ध झाले. त्याला आज १६५ वर्ष पूर्ण झाली. १५ ऑगस्ट १९४७ साली हिंदुस्थान स्वतंत्र झाला. ज्ञात-अज्ञात स्वतंत्र सैनिकांच्या बलिदानाला स्वप्नपूर्तीचा आनंद मिळाला. एका पिढीकडून या स्वातंत्र्याचा वारसा आज ६५ वर्षानंतर दुसर्या पिढीकडे पोहचला. उद्या तो तिसर्या पिढीकडे जाणार पण त्या ज्ञात-अज्ञात स्वतंत्र सैनिकांचे स्वराज्याचे स्वप्न आज कशा स्थितीत आहे तर ... भ्रष्टाचाराने, विषमतेने आक्राळ-विक्राळ रूप धारण केले आहे. स्वातंत्र्याचा लाभ संपूर्ण जनतेपर्यंत पोहचलेला नाही. स्वतंत्र मिळाले, पण कुणाला ? हा प्रश्न भेडसावतो आहे अशी परिस्थिती. इंग्रज या देशातून हटवला गेला पण आज स्वकीयांनीच देशाची लुट चालवली आहे. गुंडगिरी, दहशदवाद, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, सामाजिक विद्वेष यांच्या विळख्यात समाज आणि देश सापडला आहे. जनता अधिकाधिक ग्रासली जात आहे. लुटणारे, अन्याय करणारे गोरे गेले आणि काळे आले. फरक एवढाच झाला. स्वतंत्र लढ्यातील बलिदानाला, त्यागाला, देशभक्तीला असे फळ यावे यासाठी का हजारो हुतात्म्यांनी बलिदान केले ? आपण निमुटपणे हे सारे बघत बसायचे ? स्वतंत्र मुठभर लोकांपुरतेच मर्यादित होऊ द्यायचे ? नाही..! असे करून चालणार नाही...!! ही स्थिती जर देशाची आहे तर महाराष्ट्राचीही परिथिती काही वेगळी नाही.


  १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झालेले आणि लक्षावधी कष्टकर्यांच्या घामाने संपन्नतेकडे जाणारे आपले महाराष्ट्र राज्य १ मे १९६० रोजी अस्तित्वात आले. मराठी माणसाला व मराठी भाषेला धन्य धन्य वाटले. ५३ वर्ष उलटली महाराष्ट्र राज्याच्या अस्तित्वाला.. पण आजही खेड्यापाड्यात, वाडीवस्तीवर पिण्याचे पाणी नाही. रस्ते, वीज, रोजगाराच्या संधी नाहीत कि विस्थापितांना मुलभूत हक्क नाहीत. आधीच महागाईने-बेरोजगाराने सर्व सामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. त्यातच जोडीला दहशदवाद व भांडवलशाही जनसामन्यांस भरडते आहे. सामान्य माणसाचे जीवन अगदी बिकट झाले आहे. गाव असो किंवा शहर परिस्थिती खालावत चालली आहे. राज्यात किमान २ लाख ४५ हजार कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. वीज टंचाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराने गेल्या ६० वर्षाचा उच्चांक गाठला आहे. या सर्व समस्यांनी संपन्न महाराष्ट्राची दुराव्यस्था झाली आहे व ती आणखीनच व्हावी यासाठी काही राजकीय पक्ष प्रयत्न करत आहे हीच आहे का लोकशाही ?


  वास्तविक पाहता लोकांनी लोकांसाठी लोक सहभागातून चालवलेली राज्य पद्धती म्हणजे लोकशाही. याचाच अर्थ राज्य जनतेचे आहे. जनता सत्ताधीश आहे. लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचारी तिचे सेवक आहेत. कारण २६ जानेवारी १९५० रोजी देश प्रजासत्ताक झाला म्हणजे जनता या देशाची मालक झालेली आहे. परंतु आचे प्रस्थापित राजकारणी मात्र लोकशाहीची 'लेकशाही' म्हणजेच घराणेशाही बनवत आहे व खरी सामान्य जनता मात्र हतबल झाली आहे. हे चित्र बदलण्याची एकाही राजकीय पक्षाची इच्छाशक्ती नाही. यासाठीच तुमच्याआमच्यासारख्याच सर्वसामान्य माणसांतून एक असामान्य व्यक्तिमत्व पुढे येत आहे ते म्हणजे ... श्री. उदयनाथजी महाराज. महाराजांच्या तेजस्वी विचारांनी प्रभावित होऊन "प्रजेतुनच प्रजेचा राज्यकर्ता" घडविण्यासाठी हिंदुस्थान प्रजा पक्षाची स्थापना दि. १९ नोव्हेंबर २००८ रोजी झाली आहे. कार्यकर्ता हाच नेता, तोच उद्याचा राज्यकर्ता या विचाराने कार्य सुरु केले आहे. आज मितीला संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाचे साडेपाच लाख सदस्य आहेत.


  सामाजिक न्यायासाठी प्रस्थापितांना दूर सारून विस्थापितांना हक्क देण्यासाठीच राजकारण हीच हिंदुस्थान प्रजा पक्षाची प्रमुख भूमिका आहे. भ्रष्टाचार, बेरोजगारी, आर्थिक विषमता, महागाईचे निर्मुलन करणे हाच उद्देश आहे. सर्व समाजाला संविधानाप्रमाणे समान संधी, समान प्रतिष्ठा न्याय व सत्तेतील सहभाग देणे हाच पक्षाचा कार्यक्रम आहे. विस्थापित, कष्टकरी, वंचित, उपेक्षित, शोषित अशा सर्वसामन्यांशी पक्षाची बांधिलकी आहे. त्यांच्या उद्याच्या भविष्यासाठी सामुहिक कृतीतून संविधानिक मार्गाने जनतेला (वंचितांना) हवा असणारा समर्थ राजकीय पर्याय उभा करण्याचा हिंदुस्थान प्रजा पक्षाचा प्रयत्न आहे. भाषावाद, प्रांतवाद, जातीयवाद अथवा धर्मवाद विरहीत प्रगत आणि सामर्थ्यवान हिंदुस्थान घडविणे हेच आमचे ध्येय आहे. यात आपली साथ व सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.


  चला तर मग पुन्हा एकत्र येऊया व स्वराज्याचे सुराज्य घडवूया..!

  हिंदुस्थान प्रजा पक्ष तुमच्यासाठी हे करेल...

 • भ्रष्टाचार निर्मुलनासाठी प्रभावी भ्रष्टाचार निर्मुलन कायदा व विशेष न्यायालय स्थापन करणार.
 • दहशदवाद आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी विशेष कायदा व त्याची अंमलबजावणी करण्याकरिता स्वतंत्र न्यायालय, सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याकरिता स्पेशल फोर्स स्थापन करू...
 • शेतकऱ्याचा कर्जबाजारी पणाला आळा घालण्यासाठी स्वतंत्र शेती सहाय्यता विभाग स्थापून शेतकरी कर्जबाजारी होणार नाही याची दक्षता घेऊ व त्याला योग्य ते अर्थसहाय्य सरकारी तिजोरीतून उपलब्ध करून देऊ तसेच त्याच्या शेत मालाला योग्य बाजार भाव देऊ जो उत्पादन खर्चावर नफ्याचे प्रमाण ठरवून दिला जाईल.
 • वस्ती तिथे सर्व नागरी सुविधा.. उदा. रस्ता, वीज, पाणी, आरोग्य सोयी व प्राथमिक शिक्षण सोय.
 • समाजातील सर्व थरांना (घटकांना) त्यांच्या उत्पन्न क्षमतेनुसार स्वताच्या मालकी हक्काचे घर, देणारी सरकारी गृह योजना राबवून जनतेच्या निवाऱ्याचा प्रश्न्न सोडवू.
 • मराठवाडा, विदर्भ, खानदेश व कोकण यांच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करून तिची पारदर्शक अंमल बजावणी केली जाईल.
 • अल्पसंख्याक समुदायाच्या मुलभूत हक्कांच्या रक्षणासह त्यांच्या विकासासाठी विशेष योजना व सवलती राबविल्या जातील.
 • लघु उद्योग व सहकारी उद्योग यांना अल्प व्याजदराने कर्ज पुरवठा व वीज-पाणी-रस्ता या सोयींसह बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या जातील.
 • बेरोजगार निर्मुलनासाठी विशेष प्रयत्न करून नवीन औद्योगिक वसाहती निर्माण केल्या जातील व तरुणांना शिक्षण व रोजगारात गुणवत्तेच्या आधारित समान संधी देऊ, बेरोजगारांना रोजगार / व्यवसायाची हमी.
 • दारिद्रय निर्मुलनासाठी दारिद्रय रेषेतील जनगनना नवे निकष लावून पुन्हा केली जाईल. त्यावर कठोर उपाय योजना केल्या जातील.
 • दलित, आदिवासी, ओबीसी, कष्टकरी, अल्पसंख्याक तसेच भटक्या विमुक्त जाती-जमातींना खाजगी, सहकारी तत्वावरील व्यापार उद्योगात नोकऱ्यांना प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करू.
 • येणारी भावी पिढी भय, भूख व भ्रष्टाचार मुक्त समाजाचा घटक असेल यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करू...
 • जीवनावश्यक वस्तूंचे भाव नियंत्रित करू व त्यांच्या उत्पादनाकडे विशेष लक्ष पुरवून राज्यात महागाईला आवर घालू.
 • करव्यवस्था अधिक स्पष्ट व सुलभ करून राज्याचा महसुल वाढविण्याचा प्रयत्न करू.
 • वीज-पाणी टंचाई कायम स्वरूपी दूर करून राज्य वीज उत्पादन व पाण्याच्या नियोजनाबाबत स्वयंपूर्ण बनवू.
 • महिला बचत गटांना उद्योग / रोजगार निर्मितीसाठी अल्प व्याजदरात अर्थसहाय्य देऊन त्याद्वारे निर्माण झालेल्या उत्पादनाला योग्य बाजारपेठा मिळवून देण्याचा प्रयत्न करू.
 • महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षित जीवनासाठी प्रत्येक तालुक्यात "शक्तीकेंद्र" स्थापन करून महिलांवरील अत्याचार व अन्यायाला आळा घालू.
 • वयोवृद्ध कष्टकर्यांना आधार पेन्शन योजना दिली जाईल.
 • बेदखल कुळांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी विशेष प्रयत्न करू व भूमिहीनांना भूमिधारक बनवून स्वयंपूर्णता देऊ.

  This party has no currently elected MPs.
  This party has no currently elected MLAs.

Photo Gallery


Video Gallery